अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी गेली ३१ वर्षे अनवाणी रहाणारे शिये (जिल्हा कोल्हापूर) येथील निवास पाटील !

श्री. निवास पाटील

कोल्हापूर – अयोध्येत श्रीराम मंदिर होण्यासाठी अनेकांनी विविध संकल्प केले होते. त्यांपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शिये येथील श्री. निवास पाटील यांनी ‘जोपर्यंत श्रीराम मंदिर होत नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही’, असा संकल्प केला होता. गेली ३१ वर्षे ते अनवाणी फिरत आहेत. येत्या २२ जानेवारीला शिये गावातील गावकर्‍यांकडून त्यांचा सत्कार करून त्यांना पादत्राणे दिली जाणार आहेत.

या संदर्भात श्री. निवास पाटील म्हणाले, ‘‘६ डिसेंबर १९९२ या दिवशी झालेल्या कारसेवेत माझ्यासह १५ शिये ग्रामस्थांचा सहभाग होता. ११ वाजून ५५ मिनिटांनी आम्ही बाबरीचा ढाचा उद्ध्वस्त करण्यात यशस्वी झालो. यानंतर भव्य मंदिर झाल्याविना ज्याप्रकारे कोठारी बांधवांनी बलीदान दिले, तो आदर्श डोळ्यांमोर ठेवून मंदिर पूर्ण होईपर्यंत चप्पल न घालण्याचा संकल्प केला. प्रभु श्रीरामचंद्र आता त्या ठिकाणी परत विराजमान होत आहेत, यापेक्षा मोठा आनंद नाही.’’