म. गांधींविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

म. गांधी यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या विरोधात कोणताही दखलपात्र गुन्हा लागू होत नसला, तरी न्यायालयात केलेली खासगी तक्रार नोंद करून घेणे योग्य आहे, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अलोक पांडे यांनी दिला आहे.

मुंबई येथे नशेत असणार्‍या २१ वर्षीय मुलीवर बलात्कार करणार्‍यावर गुन्हा नोंद !

या प्रकरणी वरळी पोलिसांनी चौकशी चालू केली आहे. बलात्कार १३ जानेवारीला झाल्याचे तिने म्हटले आहे. आरोपीचे नाव हेतिक शाह आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

मराठा आरक्षण मोर्चाचा ए.पी.एम्.सी.तील व्यापार्‍यांसह शेतकर्‍यांना फटका

मराठा आरक्षण मोर्चाचा वाशी येथील ए.पी.एम्.सी. बाजारामधील मुक्काम एक दिवस वाढल्याने मुंबई आणि उपनगरे यांना पुरवठा होणार्‍या भाजीपाल्यावर  परिणाम झाला.

मुख्य कार्यक्रमात व्यासपिठावर केवळ २ साहित्यिक, तर १२ राजकारणी असणार !

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होणार्‍या साहित्य संमेलनाच्या मुख्य कार्यक्रमामध्ये मंचावर साहित्यिक म्हणून केवळ आजी-माजी संमेलनाध्यक्ष दिसणार आहेत, तर १२ राजकारण्यांना निमंत्रित म्हणून स्थान दिले आहे, असे पत्रिकेतील माहितीवरून दिसून येते.

लाखोंच्या संख्येने सरकारकडे हरकती पाठवा !

 जे अधिवक्ते आहेत, त्यांनी सर्व गोष्टींचा अभ्यास करून अध्यादेशावर हरकती पाठवण्यासाठी त्वरित प्रयत्न करावेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य !

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या ५ मासांच्या लढ्यानंतर सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या.

रत्नागिरीत श्री लोकमान्य सोसायटीत साकारली श्रीराममंदिराची ३० बाय २० फुटांची भव्य रंगावली

रत्नागिरीतील रहिवाशांनी एकत्र येत श्रीराममंदिराची भव्य रंगावली साकारली. तसेच रामरक्षा पठण करून आनंदोत्सव साजरा केला. सर्व रहिवाशांनी पारंपरिक वेशभूषा केली होती.

Close Unauthorized  Madrassa:अनधिकृत मदरसा बंद करण्यासाठी धोपेश्वर परिसरातील ग्रामस्थांना करावे लागले उपोषण !

अनधिकृत मदरसा बंद करण्यास वारंवार मागणी होत असतांनाही त्यावर प्रशासन कारवाई का करत नाही ? याचेही उत्तर प्रशासनाने जनतेला द्यायला हवे !

नांदिवडे (रत्नागिरी) येथे पतीची हत्या केल्याप्रकरणी पत्नी आणि प्रियकर यांना अटक

२६ जानेवारी या दिवशी पती सुरेश घरात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना दवाखान्यात घेऊन जायचे आहे, असे सांगत शीतय यांनी गावात माहिती दिली.

मिरज येथे महापालिकेत डॉ. अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने धरणे आंदोलन !

कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वार निम्मे बंद करून त्याच्यासमोरच बसल्याने कामासाठी ये-जा करणार्‍या नागरिकांची कुचंबणा झाली.