नागपूर येथे लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यात ७१ टक्के आरोपी निर्दाेष !

लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यात तात्काळ आणि कठोर कारवाई केल्यासच ते रोखले जातील !

मिरज येथे अवैध धंद्यावर कारवाई न केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकाचे पोलीस मुख्यालयात तडकाफडकी स्थानांतर !

केवळ स्थानांतर करून पोलीस अधिकार्‍यांच्या वृत्तीत फरक पडणार का ? अशा पोलीस अधिकार्‍यांना बडतर्फ करून त्यांना आजन्म कारागृहात पाठवले पाहिजे !

तुरीचे भाव १० सहस्र रुपयांवर गेले !

यंदा तुरीचे उत्पादन अल्प झाले असून सर्वच बाजारात तुरीला चांगली मागणी आहे.राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर १० सहस्र ४०० रुपये प्रतिक्विंटल इतके झाले आहेत.आगामी दिवसांत हे भाव सहजपणे ११ ते १२ सहस्रांपर्यंत जाऊ शकतात, असा अंदाज आहे.

सूरज चव्हाण यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. कोराना महामारीच्या काळातील खिचडी घोटाळ्याच्या प्रकरणी ‘ईडी’ कोठडीत असलेल्या सूरज चव्हाण यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

आय.ए.एस्., आय.पी.एस्. आणि खेळाडू होण्यापेक्षा पोलीस किंवा शिक्षक होण्याकडे कल !

देशातील मुलांना आय.ए.एस्., आय.पी.एस्. खेळाडू होण्यापेक्षा पोलीस किंवा शिक्षक होण्यात जास्त रस आहे, तसेच २१ टक्के मुलांना काय करायचे ? याची माहिती नाही किंवा विचार केलेला नाही, तर २.१ टक्के मुलांना काम करण्यात रस नाही, असे लक्षात आहे.

विकासआराखड्यातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यास पुणे महापालिकेकडून प्राधान्य !

विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने अपूर्ण रस्त्यांची सूची करण्याच्या सूचना पुणे महापालिकेकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत .

मुंबईत शस्त्रधारी गाडी आणि व्यक्ती सापडल्याचा खोटा संदेश

व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम यांवर खोटा संदेश पाठवणार्‍यांच्या विरोधात ट्राँबे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. ‘शस्त्रधारी व्यक्ती आणि गाडी यांना अणुशक्तीनगर परिसरात पकडण्यात आल्या’चा खोटा संदेश आरोपीने सामाजिक माध्यमांवर पसरवला होता.

सांगली येथे लिंगायत समाजाचा अड्डपालखी सोहळा उत्साही वातावरणात पार पडला !

सांगली जिल्हा वीरशैव लिंगायत समाज, शिवबसव सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ आणि लिंगायत एकता प्रतिष्ठान यांच्या वतीने १६ ते २४ जानेवारी या कालावधीत आध्यात्मिक आशीर्वचन आणि संगीत शिवकथेचे आयोजन येथील तरुण भारत स्टेडियमवर आयोजित करण्यात आले होते.

गडकोट मोहिमेसाठी जाणार्‍या सांगली येथील धारकर्‍यांना सनातन संस्थेच्या वतीने शुभेच्छा !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची वर्ष २०२४ ची धारातीर्थ यात्रा अर्थात मोहीम ही २४ ते २८ जानेवारी या कालावधीत दुर्ग श्रीरायरेश्वर ते श्रीप्रतापगड (मार्गे श्रीक्षेत्र महाबळेश्वर) अशी होत आहे.

इंडिया आघाडी यशस्वी होणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

गाण्यासाठी सर्व जणांना एकत्र गावे लागते. प्रत्येकाने वेगळे गाणे गाऊन चालत नाही. ही आघाडी नव्हतीच. त्यामुळे ती यशस्वी होणार नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.