Chhatrapati Sambhaji Censor Board : ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाला अद्यापही मिळाले नाही सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र !

केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळावर केंद्र सरकारचे नियंत्रण असल्याने सरकारने या विषयाकडे लक्ष द्यावे, असेच हिंदूंना वाटते !

रामराज्याच्या दिशेने वाटचालीसाठी ३० जानेवारीला हुपरी (कोल्हापूर) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते केवळ स्वराज्य नव्हे, तर ‘हिंदवी स्वराज्य’ होते. आज आपण एकीकडे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे करत आहोत, अन् दुसरीकडे अयोध्येत भव्य श्रीराममंदिरात रामलला विराजमान झाले आहेत.

मुंबई पोलीस नालायक ! – निखिल वागळे

‘मुंबई पोलीस नालायक आहेत. तक्रारीची पोचही ४८ घंट्यांत नाही. माहीम पोलीस ठाणे तर भंगारात विकले पाहिजे. आमेन (निश्चित)’, असे अपशब्द वापरून पुरोगामी पत्रकार निखिल वागळे यांनी त्यांचा राग ‘एक्स’वर व्यक्त केला.

प्रभु श्रीरामाप्रमाणे आदर्श आचरण करून स्वतःमध्ये रामराज्य निर्माण करूया ! – सुनील कदम, हिदु जनजागृती समिती

प्रभु श्रीराम हे आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श मित्र, आदर्श बंधू, तसेच आदर्श शत्रू होते. त्यांचे गुण स्वतःमध्ये आणून अंतःकरणात रामराज्य निर्माण करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी केले.

आरक्षणाविषयीच्या अन्य प्रतिक्रिया

बसगाड्या जाळल्या, घरेदारे जाळली, पोलिसांना मारले आदी गुन्हे न्यायालयीन आदेशाखेरीज मागे घेता येत नाहीत. अन्य गुन्हे मागे घेतले जातील.

आज सर्वपक्षीय ओबीसी नेते आणि विविध संघटनांची बैठक !

छगन भुजबळ यांनी २८ जानेवारीचे सर्व कार्यक्रम रहित केले असून त्या दिवशी सायंकाळी ५ वाजता मुंबई येथील शासकीय निवासस्थानी सर्वपक्षीय ओबीसी नेते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी यांची बैठक बोलावली आहे.

तुमच्या सर्व मागण्या मान्य झाल्या, आता आरक्षण केव्हा मिळणार ? हे मुख्यमंत्र्यांना विचारा ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २७ जानेवारी या दिवशी ‘एक्स’वर पोस्ट करत मराठा आरक्षणासाठी लढा देणार्‍या मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक करून आपले मत व्यक्त केले आहे. 

सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करणार्या दोघांना मुंब्रा पोलिसांनी केली अटक

डॉ. पप्पूकुमार बोदेसम गौतम या व्यक्तीने प्रभु श्रीराम यांच्या संदर्भातील धार्मिक श्रद्धा दुखावण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करून हिंदु धर्मियांच्या श्रद्धास्थानाचा अपमान केला होता.

राज्यात १८ वर्षांखालील ६ लाख पुरुषांना उच्च रक्तदाब, तर ४ लाख जणांना मधुमेह !

राज्यात गेल्यावर्षी सप्टेंबरपासून चालू झालेले आणि मार्चपर्यंत असणार्‍या ‘निरोगी तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ या अभियानाद्वारे १८ वर्षांवरील पुरुषांची आरोग्यविषयक तपासणी करण्यात येत आहे.

१३ सहस्र रुपयांची लाच घेतांना मंडल अधिकारी आणि तलाठी यांना रंगेहात पकडले !

१३ सहस्र रुपयांची लाच घेतांना फलटण येथील मंडल अधिकारी जितेंद्र कोंडके आणि सजा फलटणच्या तलाठी श्रीमती रोमा कदम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.