माथाडी कामगार आणि व्यापारी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी समितीची स्थापना होणार !

माथाडी कामगार आणि व्यापारी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व्यापारी अन् माथाडी बचाव कृती समितीची लवकरच स्थापना करण्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी दिली.

सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक !- अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

जर आरक्षणाचा प्रश्न मिटला असेल, तर मग कोर्टात ‘क्युरेटीव्ह पिटीशन’ (उपचारात्मक याचिका) प्रविष्ट का आहे ? असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २९ जानेवारी या दिवशी उपस्थित केला आहे.

पुणे येथील जुन्या वाड्यांना ‘झोपडपट्टी’ घोषित करून पुनर्विकास केल्याचा ‘एस्.आर्.ए.’चा अहवाल दडवला !

असा चुकीचा अहवाल का दिला जातो ? त्यातून कुणाचा आर्थिक लाभ होतो ? याचेही अन्वेषण होणे आवश्यक आहे !

आजपासून अमळनेर येथे ९७ वे मराठी साहित्य संमेलन !

साहित्य संमेलनानिमित्त अमळनेर शहराच्या विविध मार्गांवर विविध सामाजिक संस्थांनी स्वागत कमानी उभारून साहित्यिकांचे स्वागत केले आहे.

विविध बँकांमध्ये सहस्रो कोटी रुपयांची ठेव असणारी पिंपरी-चिंचवड महापालिका घेत आहे ५५० कोटी रुपयांचे कर्ज !

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध बँकेमध्ये ५ सहस्र कोटी रुपयांच्या ठेवी असून त्यावर ८ टक्के दराने व्याज मिळते. असे असतांनाही मोशी रुग्णालय आणि पुणे-मुंबई महामार्गाच्या सुशोभीकरणासाठी ५५० कोटी रुपये कर्जाचे प्रस्ताव अधिकोषांतून मागवण्यात आले आहेत.

नाशिक येथील २८ विद्यार्थ्यांना विषबाधा !

नाशिकमधील भोसला मिलिटरी शाळेची ३ दिवसीय सहल रायगडमध्ये गड-दुर्ग पहाण्यासाठी आली होती. यात १०३ विद्यार्थी होते.

जालना येथे जाणारा गॅस टँकर अचानक उड्डाणपुलाच्या दुभाजकावर चढला !

जालना येथे जाणारा एक गॅस टँकर अचानक उड्डाणपुलाच्या दुभाजकावर चढला. त्यामुळे टँकरचे २ व्हॉल्व्ह उघडले असून त्यातून गॅस गळती होत आहे. येथील सिडको बसस्थानक भागात टँकरमधून गॅस गळती होत असल्याने आणीबाणी उद्भवली आहे.

सातारा येथील ‘कस्तुरबा’ रुग्णालयासाठी आधुनिक वैद्यांची वानवा !

अशी चेतावणी का द्यावी लागते ? जिल्हा आरोग्ययंत्रणेला जनतेची गैरसोय लक्षात येत नाही का ? यातून जनतेच्या जिवाची पर्वा प्रशासनाला किती आहे ? हे लक्षात येते !

उच्चशिक्षण संस्थांना ‘वन नेशन वन डेटा प्लॅटफॉर्म’ लागू करण्याचा निर्णय !

राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) देशभरातील उच्चशिक्षण संस्थांच्या मूल्यांकन पद्धतीमध्ये महत्त्वाचे पालट करण्यात आले आहेत.

बनावट (खोटी) क्रीडा प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी पोलिसाच्या विरोधात गुन्हा नोंद !

राज्य राखीव पोलीस दलातील सशस्त्र पोलीस भरतीसाठी बनावट क्रीडा प्रमाणपत्र सादर करून ओबीसी खेळाडू प्रवर्गातून भरती झालेल्या वर्धा येथील नवप्रविष्ट पोलीस शिपायाच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.