नौकेवरील २३ पाकिस्तानी नागरिकांची सुटका
मुंबई – भारतीय नौदलाने अरबी समुद्रात इराणच्या नौकेला समुद्री दरोडेखोरांच्या (चाच्यांच्या) कह्यातून यशस्वीरित्या सोडवले आहे. २१ घंट्यांच्या कारवाईनंतर हे यश मिळाले. विशेष म्हणजे या नौकेवर २३ पाकिस्तानी नागरिक होते.
#INSSumedha intercepted FV Al-Kambar during early hours of #29Mar 24 & was joined subsequently by the guided missile frigate #INSTrishul.
After more than 12 hrs of intense coercive tactical measures as per the SOPs, the pirates on board the hijacked FV were forced to surrender.… https://t.co/2q3Ihgk1jn pic.twitter.com/E2gtTDHVKu
— SpokespersonNavy (@indiannavy) March 29, 2024
नौदलाने दिलेल्या माहितीनुसार त्याला २८ मार्चच्या संध्याकाळी समुद्री चाच्यांनी इराणच्या मासेमारी करणार्या ‘अल कंबार ७८६’ या नौकेचे अपहरण केल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे भारतीय नौदलाने ‘आय.एन्.एस्. सुमेध’ आणि ‘आय.एन्.एस्. त्रिशूल’ या २ युद्धनौका त्या नौकेच्या सुटकेसाठी पोचल्या.
२१ घंट्यांच्या कारवाईनंतर समुद्री चाच्यांनी भारतीय नौदलाकडे शरणागती पत्करली.