
नवी मुंबई – येथील घणसोली भागातील जनाई कंपाऊंड आणि शिवाजी तलावाजवळ धाड घालून आतंकवादविरोधी पथकाने ५ घुसखोर बांगलादेशींना कह्यात घेतले. ३० मार्च या दिवशी ही कारवाई करण्यात आली.
जमाल शेख (वय २२ वर्षे), रेबुल समद शेख (वय ४० वर्षे), रोनी सोरिफुल खान (वय २५ वर्षे), जुलू बिलाल शरीफ (वय २८ वर्षे) आणि महंमद मुनीर महंमद सिराज मुल्ला (वय ४९ वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांची नावे आहेत. या सर्वांच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मागील वर्षीही आतंकवादविरोधी पथकाने नवी मुंबईमध्ये ९ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली होती. त्यामधील ३ जण बलात्काराच्या गुन्ह्यामधील पलायन केलेले आरोपी होते.
संपादकीय भूमिका :बांगलादेशी घुसखोरांची समस्या समूळ नष्ट होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत ! |
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा