श्री तुळजापूर देवस्थानाने मंडप आणि पिण्याचे पाणी उपलब्ध न केल्याने भाविकांची गैरसोय !  

ऐन उन्हाळ्यात मंदिर प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार !

संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुलातील नवीन सिद्ध केलेला कृत्रिम धावमार्ग केवळ पाचच दिवसांत उखडला !

धावमार्गाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होणे यात भ्रष्टाचार झाला नसेल कशावरून ? कोट्यवधी रुपये खर्चून सिद्ध केलेला धावमार्ग पाचच दिवसांत कसा उखडतो ? अशा प्रकारे पैशांची उधळपट्टी करणार्‍यांकडून पैसे वसूल करायला हवेत !

पुणे येथील खडकवासला जलाशय रक्षण अभियानाची यशस्वी सांगता !

हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी शाखा आणि समविचारी संघटना यांच्या वतीने संयुक्तरित्या राबवलेल्या ‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहिमेची यशस्वी सांगता ३० मार्च या दिवशी करण्यात आली.

४२ कोटी रुपये वसुलीसाठी महापालिकेकडून १ सहस्र ५०० गाळेधारकांसाठी जप्ती मोहीम चालू !

‘आर्थिक वर्ष संपण्यासाठी ३ दिवस बाकी असतांना महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलांमधील १ सहस्र ५०० गाळेधारकांकडील ४२ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी कर विभागाने जप्ती मोहीम चालू केली आहे.

गांजामुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले, तो तुम्ही ओढू नका !

मद्य हेही शरिरास हानीकारक असल्याने ‘ते पिऊ नका’, असा समुपदेश हनी सिंह का देत नाहीत ? केवळ एकांगी सांगून काय उपयोग ?

मान्सूनपूर्व कामे मेपर्यंत पूर्ण करा ! – अमोल येडगे, जिल्हाधिकारी

येत्या पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मान्सूनपूर्व कामे मेपर्यंत पूर्ण करा, तसेच पुरामुळे बाधित होणार्‍या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कृती आराखडा सिद्ध ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराची निवड नाही !

याच मतदारसंघातून सलग ५ वेळा निवडून आलेल्या भावना गवळी यांनी वेळोवेळी या मतदारसंघावर आपला दावा केला आहे. त्यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचेही स्पष्ट केले; पण त्या जागेवर अद्याप उमेदवार ठरला गेलेला नाही.

नागपूर येथे रश्मी बर्वे यांच्याऐवजी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे काँग्रेसचे उमेदवार !

४६ वर्षीय बर्वे यांनी स्वत:च्या उत्पन्नाचा स्रोत शेती आणि शेतीपूरक व्यवसाय असा दाखवला आहे. यातून वर्षाला ११ लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळणार्‍या बर्वे यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती सव्वाचार कोटी रुपयांहून अधिक आहे.

शरद पवार यांच्या पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली सूची घोषित !

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याविषयीची माहिती दिली.

पुणे येथील ‘रोझरी स्कूल’चे संचालक विनय अरहाना यांसह दोघे अटकेत !

सीआयडीच्या पथकाने कर्ज अपव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) दोघांना कह्यात घेतले. दोघांना मध्यरात्री शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात उपस्थित करण्यात आले.