पुणे येथील चतु:श्रृंगी पोलिसांची कारवाई !
पुणे – बाणेर रस्त्यावरील ‘सकाळनगर’ भागामध्ये घरफोड्या करणार्या महंमद रईस शेख आणि महंमद रिझवान शेख यांना चतु:श्रृंगी पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. हे दोघेही मुंबईचे असून त्यांच्याकडून ३० तोळे सोन्याचे दागिने आणि २० लाख रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २३ फेब्रुवारी या दिवशी सकाळनगर येथे भरदिवसा २ घरफोडीच्या घटना घडल्या. त्याचे अन्वेषण चतु:श्रृंगी पोलीस करत होते. परिसरातील ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरणाची पडताळणी केली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमांतून चोरांचा शोध घेण्यात आला. पुढील अन्वेषण साहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील करत आहेत.
संपादकीय भूमिका :
|