‘भगवा आतंकवाद’ म्हणणार्‍या सुशीलकुमार शिंदे यांनाही हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा देतो ! – राम सातपुते, भाजप

‘भगवा आतंकवाद म्हणणार्‍या सुशीलकुमार शिंदे यांनाही हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा’, असे म्हणत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका केली.

पुणे जिल्ह्यांतील ‘उजनी धरणा’तील गाळ काढावा !

उजनी धरणातून गाळ आणि गाळमिश्रित वाळू काढण्याचा निर्णय हा सरकारी कागदपत्रांमध्ये अडकला असून दिवसेंदिवस धरणाच्या गाळ्यात वाढ होऊन पाणीसाठा अल्प होत आहे.

घटस्फोटानंतर पत्नीने खरेदी केलेल्या घरावर पतीची मालकी नाही ! – कौटुंबिक न्यायालय

पत्नीने स्वत:च्या पैशाने घेतलेल्या घरावर घटस्फोटानंतर पतीचा अधिकार रहाणार नाही, असा निर्णय मुंबई येथील कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे.

प्रक्षोभक भाषणप्रकरणी हिंदुत्वनिष्ठ आमदारांवरील कारवाईविषयी न्यायालयाने मागितला अहवाल !

‘हिंदूंवरील अन्यायाची व्यस्था मांडणे’ ही प्रक्षोभक भाषणे आहेत कि वस्तूस्थिती ? याविषयी पोलिसांनी नि:पक्षपणे अहवाल सादर करावा !

वाघोली (पुणे) येथील ‘पोदार स्कूल’मध्ये महिला पालकांचे ठिय्या आंदोलन !

हे प्रशासनाच्या वेळीच लक्षात का आले नाही ? आता पुन्हा पालकांकडे शुल्क मागणे म्हणजे त्यांच्यावर अन्यायच आहे !

हिंदु देवतांवर आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा ! – भाजपचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सदर ‘पोस्ट’ची सत्यता पडताळून ‘सायबर क्राईम’च्या अधिकार्‍यांना सूचना करत सदर प्रकरणाचे सखोल अन्वेषण करण्याचे आश्वासन दिले.

मुंबईमध्ये मराठीत पाटी न लावणार्‍या दुकानांना दुप्पट मालमत्ता कर आकारला जाणार !

मराठी भाषेत नामफलक न लावणार्‍या दुकानांनी तात्काळ मराठी भाषेत फलक लावावेत. याचे पालन न करणारी दुकाने आणि आस्थापने यांवर यापुढे कठोर कारवाई करावी लागेल.

उरुळी कांचनजवळील (पुणे) भवरापूर येथे ‘अंनिस’चा ‘स्मशान भेट’ कार्यक्रम !

भूते पहाण्यासाठी किंवा त्यांचे अस्तित्व जाणवण्यासाठी सूक्ष्म ज्ञानेंद्रियांची आवश्यकता असते. सूक्ष्म ज्ञानेंद्रिय साधना करूनच जागृत होतात, हे नास्तिकतावाद्यांना केव्हा समजणार ? असे हास्यास्पद उपक्रम राबवून नास्तिकतावादी स्वतःचेच हसे करून घेत आहेत !

गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री पोलिसांकडून हिंदुत्वनिष्ठांवर कारवाई !

पोलीस प्रशासनाने एकूण ४० हिंदु कार्यकर्त्यांवर कारवाईची सिद्धता केली होती. ही गोष्ट विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रमुखांना समजल्यावर त्यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे पोलिसांना तात्पुरते नमते घ्यावे लागले.

Gudhi Padva 2024 : ४ राज्यांत एकूण ३३८ ठिकाणी सामूहिक गुढीपूजन, मंदिर स्वच्छता आणि सुराज्य स्थापनेसाठी शपथग्रहण !

विशेष म्हणजे या वेळी अनेक ठिकाणी मंदिरांची सामूहिक स्वच्छता करण्यात आली. गुढीपूजनानंतर सर्वांनी एकत्र येऊन ‘सुराज्य’ स्थापन करण्याची सामूहिक शपथ घेतली.