महाराष्ट्रात ९८ सहस्र ११४ मतदान केंद्रांमध्ये होणार मतदान !

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ८ सहस्र ३८२ मतदान केंद्रे, तर मुंबईमध्ये ७ सहस्र ३८० मतदान केंद्रे आहेत.

मतदानासाठी सुटी न दिल्यास खासगी आस्थापनांवर कारवाई करू ! – मुंबई निवडणूक अधिकारी

मुंबई उपनगर जिल्ह्यात समाविष्ट लोकसभा मतदारसंघात २० मे या दिवशी मतदान होणार आहे.

महायुतीला पाठिंबा द्या ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा द्या, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर केले.

राज्यभरात गुढीपाडवा सण उत्साहात साजरा !

९ एप्रिल या दिवशी राज्यभरात गुढीपाडव्याचा सण उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. राज्यात अनेक ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबईत गिरगाव, भांडुप आणि विलेपार्ले येथे नववर्ष स्वागत फेर्‍या !

९ एप्रिल या दिवशी मुंबईत गिरगाव, भांडुप आणि विलेपार्ले येथील नववर्ष स्वागत फेर्‍यांमध्ये हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेनेही सहभाग घेण्यात आला.

काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांनी स्वतःच्या परिवाराचा विकास केला ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

काँग्रेस समस्यांची जननी असून काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांनी स्वतःच्या परिवाराचा विकास केला आहे. जेव्हा इंडिया आघाडीवाले षड्यंत्र रचून राज्यातील सत्तेवर आले. त्या वेळीही त्यांनी स्वत:च्या कुटुंबाचा (परिवाराचा) विकास केला.

मराठवाड्यातून लोकसभेच्या निवडणुकीसाठी २०४ उमेदवार रिंगणात ! – राज्य निवडणूक आयोग

लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दुसर्‍या टप्प्यात महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या ८ लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे.

मराठवाड्यात ५१ तालुक्यांवर पाणीसंकट !

मराठवाड्यातील भूजल पातळीमध्ये घट होत असून जवळपास ५१ तालुक्यांवर भीषण जलसंकट निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात सद्यःस्थितीला टँकरची संख्या १ सहस्रपर्यंत पोचली आहे, तर यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

शॉर्ट सर्किटमुळे गोठा, घर जळले : ३ गोवंशियांचा मृत्यू !

मिरज तालुक्यातील भोसे येथील देवेंद्र बापू चौगुले यांच्या गोठ्याशेजारी असलेल्या खांबावर शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याने त्यांचे कौलारू घर आणि गोठा जळून खाक झाला.

हिंगोली येथे १२ वर्षीय हिंदु मुलीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधास अटक !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !