
कोल्हापूर – देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. आपल्या पक्षाच्या प्रचाराच्या सूत्रावर विरोधी पक्षाचे नेते, पदाधिकारी यांच्यावर आरोप-प्रत्यारोप होतात. असे असतांना समाजातील काही लोक जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने सामाजिक माध्यमांवर ‘पोस्ट’ टाकल्या जात आहेत. नुकतीच रोहित कुंभार या व्यक्तीने भारतमाता, प्रभु श्रीराम, लक्ष्मण यांच्याविषयी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसिद्ध केली. भारतीय जनता पक्ष याचा निषेध करते, तसेच हिंदु देवतांवर आक्षेपार्ह ‘पोस्ट’ करणार्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा, या मागणीचे निवेदन भाजपच्या वतीने पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सदर ‘पोस्ट’ची सत्यता पडताळून ‘सायबर क्राईम’च्या अधिकार्यांना सूचना करत सदर प्रकरणाचे सखोल अन्वेषण करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेशसचिव महेश जाधव, सरचिटणीस डॉ. सदानंद राजवर्धन, अधिवक्ता संपतराव पवार, अमर साठे, शैलेश पाटील, प्रदीप उलपे, अनिल कामत, अमेय भालकर यांसह अन्य उपस्थित होते.
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !
ConfirmTkt Controversy : ‘कन्फर्म तिकीट’ आस्थापनाने श्री गणेशाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले
CJP Party : कॉकरोच जनता पक्षाकडून पंचतारांकित हॉटेलमध्ये नाच-गाण्यासह मेजवानी !