चिपळूण येथे भाजप आणि ठाकरे गट यांच्या ३०० कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद

दोन्ही नेत्यांनी बेकायदेशीरपणे जमाव जमवला होता. या जमावाने महामार्गाची कोंडी करत एकमेकांवर दगडफेक करून गाड्यांचीही तोडफोड केली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांवर गुन्हा नोंद करावा.  

७ कोटींहून अधिक जणांचा ‘ऑनलाईन’ रमी खेळात सहभाग !

कायदेशीर आधार घेऊन युवकांना जुगाराकडे ओढणार्‍या ऑनलाईन खेळांवर निर्बंध आणण्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक !

पुणे येथील मगरपट्टा पोलीस चौकीतील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांसह तिघे निलंबित !

‘मगरपट्टा सिटी पोलीस चौकीमध्ये एका महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद दोरकर, महिला पोलीस कर्मचारी उषा सोनकांबळे आणि वैशाली उदमले यांना निलंबित करण्यात आले आहे.

माळीवाडा पुलाची उंची-रूंदी वाढवण्यासाठी राज्य महामार्गावर निदर्शने !

सातारा ते कागल राज्य महामार्गाच्या रस्त्याचे सहापदरीकरण करण्याचे काम चालू आहे. हाच रस्ता चारपदरी करतांना अनेक चुका झाल्या आणि त्यांचा त्रास आजूबाजूच्या अनेक गावांना गेली २० वर्षे होत आहे.

राजामाता जिजाऊ यांची प्रतिमा शासकीय कार्यालयात लावण्यासाठी बंधनकारक करण्यात यावे, यासाठी पाठपुरावा करू ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

राजामाता जिजाऊ यांची प्रतिमा शासकीय कार्यालयात लावण्यासाठी बंधनकारक करण्यात यावे, यासाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करू, असे आश्वासन भाजपचे खासदार श्री. धनंजय महाडिक यांनी दिले.

सातारा येथे आजपासून १९ फेब्रुवारीपर्यंत शिवजयंती महोत्सव !

प्रतिवर्षीप्रमाणे ‘शिवजयंती महोत्सव समिती’च्या वतीने यावर्षीही ‘शिवजयंती महोत्सव-२०२४’चे आयोजन करण्यात आले आहे.

श्रीरामनिकेतन म्हणजे वैकुंठच ! – समर्थभक्त मंदारबुवा रामदासी, दादेगाव, बीड

वासना म्हणजे ‘देह हाच मी आहे आणि सर्व काही मला, माझे आहे’, ही भावना दृढ करणारी एक शक्ती आहे. ही शक्ती जेव्हा रामरूप होईल, तेव्हा हे सर्व रामाचे आहे, हा भाव निर्माण होईल.

पिंपरी येथील ‘क्रिएटिव्ह अकादमी’चे अनधिकृत बांधकाम पाडणार !

रावेत येथील ‘क्रिएटिव्ह अकादमी’चे अनधिकृत बांधकाम महापालिका पाडणार असून अकादमीच्या इमारत मालकाला महापालिकेच्या अनधिकृत बांधकामविरोधी पथकाने नोटीस दिली आहे.

डान्सबारला पोलिसांचेच संरक्षण ! – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेले आरोप खरे असतील, तर याची सरकारने गांभीर्याने नोंद घेऊन डान्सबार बंद करण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !

हिंगोली येथे मराठा आंदोलनाच्या वेळी तरुणांनी बस पेटवली !

हिंगोली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी १६ फेब्रुवारी या दिवशी ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले. वसमत तालुक्यातील खांडेगाव पाटी येथे अज्ञात तरुणांनी बस पेटवून दिल्याने वसमत आगाराची अनुमाने ४० लाख रुपयांची हानी झाली आहे.