मुंबई – पत्नीने स्वत:च्या पैशाने घेतलेल्या घरावर घटस्फोटानंतर पतीचा अधिकार रहाणार नाही, असा निर्णय मुंबई येथील कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे. सहमालक म्हणून असलेली पतीची मालकीही रहित करण्याचा आदेश न्यायालयाने गोरेगाव येथील एका दांपत्याच्या घटस्फोटाच्या प्रकरणात दिला.
वर्ष २००१ मध्ये विवाह झालेल्या एका जोडप्याने गोरेगाव येथे घर घेतले. गृहकर्ज काढून घेतलेल्या या घराचे सर्व पैसे पत्नीने भरले होते. या दांपत्याला २ मुली आहेत. पती आणि सासरची मंडळी त्रास देत असल्याच्या कारणावरून या महिलेने घटस्फोटासाठी अर्ज केला. त्या वेळी घराला मालकीविषयी महिलेने घराच्या मालकी हक्काची कागदपत्रे आणि त्यासाठी दिलेल्या रकमेच्या पावत्या न्यायालयात सादर केल्या. त्यावरून न्यायालयाने घराची मालकी पत्नीला देतांना वरील निर्णय दिला.