शासकीय कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याच्या निर्णयाची १ मेपासून कार्यवाही !

शासकीय कागदपत्रे आणि ओळखपत्र यांवर वडिलांसह आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या निर्णयाची प्रत्यक्ष कार्यवाही चालू झाली आहे.

Reservation on Religion : ‘धर्मावर आधारित आरक्षण, ही संकल्पनाच आम्हाला अमान्य !’ – शरद पवार

वर्ष २००४ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने आंध्रप्रदेशमध्ये अनुसूचित जाती-जमातींचे आरक्षण अल्प करून ते मुसलमानांना दिले होते. आंध्रप्रदेशातही काँग्रसने मुसलमानांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. आताही कर्नाटक सरकारचा तोच प्रयत्न करत आहे.

Newsmakers Achievers Awards 2024 : पत्रकार, लेखक, चित्रपट, सामाजिक कार्य, भारतीय नृत्य आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव !

महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ‘आफ्टरनून व्हॉईस’ या ऑनलाईन वृत्तपत्राचा ‘न्यूजमेकर्स अचिव्हर्स अ‍ॅवॉर्ड २०२४’ हा १६ वा पुरस्कार सोहळा नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडला.

कोल्हापूर शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे आमचे प्रयत्न ! – श्रीकांत शिंदे, खासदार, शिवसेना

येथे ‘फुटबॉल अकादमी’ सिद्ध करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणताही भावनिक मुद्दा न करता विकासाच्या कामावर मतदान करावे, असे आवाहन शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले.

१ दिवसाच्या बाळाच्या हत्येप्रकरणी वडिलांना आजन्म कारावास !

सुरक्षा गार्ड उत्तरा हिने अन्य सुरक्षा गार्डच्या साहाय्याने आरोपीला पकडले. यानंतर आजी मेश्राम हिने तक्रार दिली. सबळ पुरावा न्यायालयासमोर मांडल्यानंतर आरोपीला वरील शिक्षा न्यायालयाने सुनावली.

कळंबा कारागृहात ‘भ्रमणभाष’ आढळल्याच्या प्रकरणी २ अधिकारी आणि ९ कर्मचारी सेवेतून बडतर्फ !

जेथे बंदीवान सुधारण्यासाठी येतात, तेथेच जर त्यांना भ्रमणभाष आणि अन्य सुविधा देण्यात येत असतील, तर ते सुधारतील कसे ?

अहिल्यानगर येथील दुय्यम कारागृहात बंदीवानांना विशेष सुविधा मिळत असल्याची माहिती !

कोपरगाव शहरात असलेल्या दुय्यम कारागृहात काही बंदीवानांना मद्य, भ्रमणभाष, अमली पदार्थांसह ‘व्हीआयपी’(महनीय व्यक्तींसाठीच्या) सुविधा मिळत असल्याची माहिती कारागृहातील काही बंदीवानांकडून मिळाली आहे.

पुणे शहरात तापमानाने उच्चांक गाठल्याने नागरिक हैराण; हवामानशास्त्र विभागाकडून ‘यलो अलर्ट’ !

यंदा मार्चच्या अखेरपासून पार्‍याने ४० शी पार केली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

अहिल्यानगर येथील हरिश्चंद्र गडावरील शिवपिंडीला तडे; पुरातत्व विभागाचे संवर्धनाकडे दुर्लक्ष !

पिंडीला तडे जाऊनही पुरातत्व विभाग मंदिराकडे का दुर्लक्ष करत आहे ? पुरातत्व विभागाचे नेमके काय काम ?

हिंदु युवतीची हत्या करणारा शेख होता विवाहित !

हिंदूंनो, लव्ह जिहादवर कायमस्वरूपी उपाय काढून युवतींचे रक्षण होण्यासाठी लव्ह जिहादविरोधी कायदाच हवा !