कोल्हापूर – शहरातील रस्ते, ‘कन्व्हेंशन सेंटर’, रंकाळा, श्री महालक्ष्मीदेवी तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी निधी, असे अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. पावनखिंड मार्गाच्या मुक्कामावर सुविधा निर्माण करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. येथे ‘फुटबॉल अकादमी’ सिद्ध करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणताही भावनिक मुद्दा न करता विकासाच्या कामावर मतदान करावे, असे आवाहन शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले. ते ३० एप्रिलला राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रसंगी हातकणंगले मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने, भाजपचे महेश जाधव, विजय जाधव यांसह अन्य उपस्थित होते.
राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर या वेळी म्हणाले, ‘‘या अगोदरच्या पालकमंत्र्यांनी कोल्हापूरवर पथकर लादण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परतावा आम्हाला करावा लागला.’’