पुण्यासह सांगली, मिरज, कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वेस्थानके बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्‍यास मुंबई येथे अटक !

कुणीही उठतो आणि बाँबस्फोट करण्याची धमकी देतो, हा खेळ झाला आहे. पोलिसांनी त्यांचा वचक निर्माण न केल्यास हे प्रकार वाढत जातील, हे निश्चित !

श्री तुळजाभवानी मंदिरात प्रशासनाकडून केवळ सशुल्क दर्शन घेणार्‍यांची सोय !

येथील श्री तुळजाभवानी मंदिरात देवीचे दर्शन घेण्यासाठी सशुल्क दर्शन रांग आणि निशुल्क दर्शन (धर्म-दर्शन) रांग अशी वेगवेगळी सोय करण्यात आली आहे.

कोल्हापूर येथे दोन बांगलादेशी महिलांना अटक

बांगलादेशींच्या हस्तकांची पाळेमुळे खणून काढून त्यांच्यावरही कारवाई करणे आवश्यक !

८५ सहस्र ५०० ग्राहक राहिले होते अंधारात

वादळामुळे दोन्ही तालुक्यांतील ८५ सहस्र ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना अंधारातच रहावे लागले होते.

मुळगाव (खेड) येथे वीजचोरी प्रकरणी महावितरणची कारवाई

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वीज चोरीचे प्रमाण शून्य टक्के असल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भाग वीज भारनियमनापासून (लोड शेडिंगपासून) वगळण्यात आला आहे.

अर्ध्या तासात पडलेल्या पावसात नद्या प्रवाहित

 केवळ अर्धा तास मुसळधार पडलेल्या पावसाने अडरे आणि अनारी परिसरातल्या नद्या आणि ओहोळही जोरदार प्रवाहित झाल्या आहेत.

Tushar Gandhi On Hindutva:(म्हणे) ‘कट्टरवादी हिंदुत्वाचा देशाला धोका !’

कट्टर हिंदुत्वनिष्ठांनी देशासाठी कोणता धोका निर्माण केला आहे, याचे एकतरी उदाहरण तुषार गांधी देतील का ? उलट धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मोहनदास गांधी यांनीच देशाला धोका दिला, हाच इतिहास आहे !

Waiting for Shiva Book Launched : ज्ञानवापीतील शिवलिंग प्राप्त करण्यासाठी आम्ही १ इंच भूमीचीही तडजोड करणार नाही !

सुप्रसिद्ध लेखक विक्रम संपत यांच्या ‘प्रतीक्षा शिवाची : काशी-ज्ञानवापीच्या सत्याचा शोध’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचे रोखठोक वक्तव्य !

गोदान एक्सप्रेसच्या डब्याखालून अचानक धूर निघाल्याने प्रवाशांचा गोंधळ !

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावाजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्याखालून अचानक धूर निघाला. त्यामुळे बोगीत गोंधळ उडाला. पडताळणी केली असता तांत्रिक अडचण असल्याचे लक्षात आले.

पुणे-सोलापूर रस्त्यावर होर्डिंग कोसळले !

पुणे-सोलापूर रस्त्यावरील कवडीपाट पथकर नाक्याजवळील गुलमोहर लॉन्स या कार्यालयासमोरील होर्डिंग कार्यालयाच्या समोर कोसळले. यामुळे दुचाकी, चारचाकी यांसह बँड वादकाच्या गाडीचीही हानी झाली आहे.