चिपळूण आणि गुहागर येथे झालेल्या वादळामुळे महावितरणची ५१ लाख रुपयांची हानी
चिपळूण – चिपळूण आणि गुहागर तालुक्यांत आलेल्या वादळी वार्यांमुळे महावितरणची मोठी हानी झाली आहे. यामध्ये अनेक गावांत विजेचे खांब कोसळणे, अनेक ठिकाणी तारा तुटणे, असे प्रकार झाले आहेत. या वादळामुळे महावितरणचे ्यकलण ५१ लाख १० सहस्र रुपयांची हानी झाली आहे. या वादळामुळे दोन्ही तालुक्यांतील ८५ सहस्र ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना अंधारातच रहावे लागले होते. आता यातील ८३ हजार ८३७ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत् चालू झाला असून, वीजजोडणीचे काम अद्यापही सुरूच आहे.