प्रतिदिन ५० प्रवाशांचा फुकट प्रवास !
पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पी.एम्.पी.एम्.एल्.) बसमधून विनातिकीट प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. मागील वर्षभरात १८ सहस्र प्रवाशांनी विनातिकीट प्रवास केला असून त्यांच्याकडून १ कोटी ३३ लाख २८ सहस्र ६०० रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे. फुकट प्रवास करणार्या प्रवाशांकडून दंड घेतला जातो; मात्र तरीही विनातिकीट प्रवास करण्याचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे प्रतिदिन २५ सहस्रांहून अधिक रुपयांची दंड वसुली ‘पी.एम्.पी.एम्.एल्.’कडून होते.
संपादकीय भूमिकाशालेय अभ्यासक्रमात धर्मशिक्षणाचा अंतर्भाव केल्यासच नागरिकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव होऊ शकते, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक ! |