पुण्यक्षेत्र आळंदी येथील चिंबळी गावाच्या बर्गे वस्ती येथे वक्फ बोर्डाचे अतिक्रमण !

मशिदीचे चालू असलेले अवैध बांधकाम त्वरित थांबवण्याची सौ. उज्ज्वला गौड यांची मागणी !

आळंदी (जिल्हा पुणे) – येथील चिंबळी गावाच्या बर्गे वस्ती येथे न्यूनतम २५ ते ३० फूट खड्डा करून वक्फ बोर्डाने नियंत्रण मिळवण्याची सिद्धता चालू केलेली आहे. हा संपूर्ण परिसर डोंगराळ, खडकाळ असा आहे. या ठिकाणी एका मशिदीचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या ‘लाईव्ह’च्या माध्यमातून मी आवाहन करत आहे की, हा वक्फ बोर्डाचा प्रश्न आपल्या देशाला पोखरून खाण्यासाठी ‘आ’ वासून उभा आहे. हा यक्ष प्रश्न आपल्यासमोर उभा असतांनाही ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीमध्ये ग्रहण लागल्याप्रमाणे एवढे मोठे बांधकाम यांनी करायला चालू केलेले आहे. ते तत्परतेने थांबवण्यात यावे आणि ज्यांनी ही जागा विकलेली आहे, त्यांच्यावरही कारवाई व्हावी, अशी मागणी समस्त हिंदु आघाडीच्या वतीने सौ. उज्ज्वला गौड यांनी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून केली. या वेळी अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्तेही उपस्थित होते. या बांधकामावर स्थगिती आली होती, हे काम थांबवायला सांगितले होते तरीही त्यांचे काम जोरात चालू आहे, हे काम तात्काळ थांबवण्यात यावे, अशी विनंती सौ. उज्ज्वला गौड यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांना केली आहे.

संपादकीय भूमिका

वक्फ बोर्डाला दिलेल्या पाशवी अधिकारांमुळे गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वक्फ बोर्डाचा लँड (भूमी) जिहाद चालू आहे. अशा संघटनेला वठणीवर आणण्यासाठी सरकारी यंत्रणा काय करणार ?