पुणे येथील धर्मांधाने लग्नाचे आमीष दाखवून २५ हून अधिक महिलांशी शारीरिक संबंध ठेवत त्यांना लुटले !

शारीरिक अत्याचारासह पैसे आणि दागिनेही उकळले !

प्रतीकात्मक छायाचित्र

पुणे – येथील फिरोज शेखने लग्नाचे आमीष दाखवून २५ हून अधिक महिलांची फसवणूक केली आहे. पुण्ो येथील या लखोबा लोखंडेला कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ‘शादी डॉट कॉम’ या संकेतस्थळावरून महिला आणि मुलीची माहिती घेत फिरोज शेख त्यांच्याशी संपर्क साधत होता. त्याने अनेक महिलांवर शारीरिक अत्याचारासह पैसे आणि दागिनेही उकळले आहेत. कोल्हापूर येथील फसवणूक झालेल्या घटस्फोटित महिलेच्या तक्रारीनंतर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्याच्यावर कारवाई केली. फिरोज शेख याला कह्यात घेतल्यानंतर २५ हून अधिक महिलांची फसवणूक केल्याची स्वीकृती आरोपीने दिली आहे.

फिरोज शेख ३२ वर्षांचा असून मूळचा इंदापूर तालुक्यातील गंगावळण येथील आहे. सध्या तो पुणे येथील कोंढवा येथे रहातो. इंदापूरमध्येपण त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद असल्याचे अन्वेषणात समोर आले आहे.

संपादकीय भूमिका

फसवणूक आणि गुन्हेगारीमध्ये अव्वल असणारे धर्मांध ! पुन्हा कुणी असे कृत्य करण्यास न धजावण्यासाठी अशा धर्मांधांना शरीयतनुसार कठोर शिक्षाच द्यायला हवी !