माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन !

माजी महापौर महेश कोठे

सोलापूर – सोलापूर महापालिकेचे माजी महापौर महेश कोठे हे प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात गेले होते. कडाक्याच्या थंडीत गंगास्नान करतांना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

वर्ष १९९२ पासून २०२२ मध्ये सोलापूर महापालिका विसर्जित होईपर्यंत ते अखंडपणे सोलापूर महापालिकेत नगरसेवक होते. महापौर, पालिका सभागृहनेता अशी दायित्वे त्यांनी पार पाडली आहेत. नुकत्याच विधानसभा निवडणुकीत महेश कोठे हे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात उमेदवार होते.