ठाणे येथील प्रख्यात मामलेदार मिसळ उपाहारगृहाचे मालक लक्ष्मण मुर्डेश्‍वर यांचे निधन

लक्ष्मण मुर्डेश्‍वर

ठाणे – येथील प्रख्यात मामलेदार मिसळ अर्थात तहसील कचेरी कँटीनचे मालक लक्ष्मण मुर्डेश्‍वर (वय ८४ वर्षे) यांचे १ डिसेंबर या दिवशी निधन झाले. त्यांच्यावर ठाणे येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार चालू होते. लक्ष्मण मुर्डेश्‍वर हे सनातन संस्थेचे हितचिंतक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक होते. राष्ट्र आणि धर्माच्या कार्याला ते नेहमीच साहाय्य करत असत.

लक्ष्मण यांचे वडील नरसिंह मुर्डेश्‍वर यांनी वर्ष १९५२ मध्ये ‘मामलेदार मिसळ’ हे उपाहारगृह चालू केले होते. त्यांच्या पश्‍चात लक्ष्मण यांनी नरसिंह यांची परंपरा अखंडित चालू ठेवली. लक्ष्मण यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन संस्था मुर्डेश्‍वर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.