मुंबई – ओला, उबेर आणि रॅपिडो यांसारख्या खासगी प्रवासी वाहतूक करणार्या सर्व आस्थापनांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. प्रवासी सुरक्षा, कार पुलिंग, परवाना, वाहतूक (ट्रॅफिक) समस्या यासंदर्भातील पारदर्शक तक्रार यंत्रणा तातडीने सिद्ध करा, याचे निर्देश परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी दिले. राज्यातील खासगी प्रवासी वाहतूक करणार्या आस्थापनांना एकाच शासकीय नियमावलीअंतर्गत आणण्यासंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.