सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचा निष्कर्ष मुंबई पोलिसांप्रमाणेच असेल ! – परमवीर सिंग, पोलीस आयुक्त, मुंबई

‘‘काही जण मुंबई पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी यांची अपकीर्ती करण्याचे काम करत आहेत; मात्र आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत.’’

यवतमाळ येथून पळून गेलेल्या धर्मांध आरोपीला नागपूर येथे अटक !

जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर पळून गेलेल्या शेख जमील उपाख्य जम्या जब्बार शेख (वय २४ वषर्े) या धर्मांध आरोपीला बाभुळगाव पोलिसांनी नागपूर येथे अटक केली.

विनामास्क ३१ डिसेंबर साजरा करणार्‍यांवर कारवाई

३१ डिसेंबर साजरा करतांना विनामास्क असणार्‍या १३ सहस्र १७९ जणांवर मुंबई महापालिकेने कारवाई केली. या कारवाईत २६ लाख ३५ सहस्र ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

शेतकर्‍याला महावितरणने ५ सहस्र १४८ रुपये भरपाई आणि वीज जोडणी त्वरित देण्याचा ग्राहक तक्रार निवारण मंचचा निकाल 

वीज वितरण सारख्या आस्थापनाने निधी नसल्याने जोडणी देता येत नाही, असे सांगणे हास्यास्पद आहे. असे असेल तर घेतलेल्या अनामत रकमेचे काय केले, तेही आस्थापनेने सांगितले पाहिजे.

अंबरनाथ येथे अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम

स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त श्री. विनायक जोशी यांच्या हस्ते ‘सनातन पंचांग २०२१’ भेट देण्यात आले.

ऐतिहासिक बाणगंगेच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन जलस्रोत बाधित करणार्‍या खोदकामाला स्थगिती

बाणगंगा हा आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे. ही संस्कृती टिकवली पाहिजे. बांधकाम व्यावसायिक येथे रात्रीचे काम करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई होईल. जोपर्यंत याविषयीचा अहवाल येत नाही, या कामाला स्थगिती देण्यात येईल – महापौर, मुंबई

बेरोजगारांच्या कर्जविषयक समस्या सुटण्यासाठी ‘प्रतिसाद कक्ष’ स्थापन करण्याची मागणी

कोरोना महामारी आणि त्यानंतरची दळणवळण बंदी यांमुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा अगोदरच आर्थिक संकटांशी सामना करत असून कोरोनामुळे आता रोजगाराची स्थिती अधिक गंभीर आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार शासकीय कार्यालयांत वस्त्रसंहितेची कार्यवाही व्हावी

अशी मागणी का करावी लागते ? सरकारी आदेशांची कार्यवाही प्रशासन स्वतःहूनच का करत नाही ?

गावागावांत शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी शासनाकडून ‘ऑनलाईन’ प्रशिक्षण

‘महाराष्ट्र राज्य पाणी आणि स्वच्छता मिशन’च्या अंतर्गत ‘फिल्ड किट’द्वारे (FTK) पाण्याची गुणवत्ता तपासण्याविषयी ‘जलजीवन मिशन’द्वारे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीतील ५ महिलांना जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ प्रशिक्षण देण्यात आले आहे.