केरळमध्ये भाजपच्या नेत्यांनी इस्टर संडेच्या दिवशी घेतल्या ख्रिस्ती धर्मगुरूंच्या भेटी !

(इस्टर संडे हा ख्रिस्त्यांचा एक सण आहे)

नेते मुरलीधरन् यांची लॅटिन कॅथॉलिक आर्च डायोसीज मुख्यालयाला भेट

थिरूवनंतपूरम् (केरळ) – भाजप राज्यातील ख्रिस्ती लोकांना स्वतःकडे वळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सध्या दिसून येत आहे. ‘इस्टर संडेच्या दिवशी ख्रिस्ती कुटुंबियांची भेट घेतली जाणार’, असे पक्षाकडून घोषित करण्यात आले होते. त्यानुसार नेते मुरलीधरन् यांनी लॅटिन कॅथॉलिक आर्च डायोसीज मुख्यालयाला भेट दिली, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन् यांनी थालास्सेरी येथील बिशप हाऊसमध्ये जाऊन आर्चबिशप मार रेमीजियस पॉल इंचानानियिल यांची भेट घेतली.

केरळमधील काँग्रेसच्या माजी नेत्यांचा एक गट ख्रिस्त्यांच्या हितासाठी काम करणार्‍या पक्षाची स्थापना करण्याच्या प्रयत्नात आहे. हा पक्ष नंतर भाजप समवेत काम करणार आहे, असे म्हटले जात आहे. राज्यातील ख्रिस्ती लव्ह जिहाद आणि अन्य प्रकरणे यांमुळे मुसलमानांच्या प्रतीच्या त्यांच्या विचारांमध्ये पालट झाला आहे. याचा लाभ  घेण्याचा प्रयत्न या गटाकडून केला जाणार आहे.