प्रत्येक मुलीला तिच्या वडिलांकडून विवाहाचा खर्च मिळवण्याचा अधिकार ! – केरळ उच्च न्यायालय

थिरूवनंतपूरम् (केरळ) – प्रत्येक मुलीला तिच्या वडिलांकडून विवाहाचा खर्च मिळवण्याचा अधिकार आहे. मग ती कोणत्याही धर्माची असो, असे केरळ उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीच्या वेळी म्हटले आहे.

१. न्यायालयाने पुढे असेही म्हटले की, असा हक्क कुणाच्या धर्माच्या आधारे घेता येत नाही. खरे तर खंडपिठासमोर प्रश्‍न उभा राहिला की, ख्रिस्ती मुलीच्या विवाहाचा खर्च तिच्या वडिलांच्या स्थावर मालमत्तेतून भागवू शकतो कि त्यातून मिळणार्‍या नफ्यातून ?

२. वडिलांशिवाय आईसमवेत रहाणार्‍या २ बहिणींनी केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुलींनी सांगितले की, त्यांच्या वडिलांनी पत्नीचे (मुलींच्या आईचे) दागिने विकून आणि सासरच्या लोकांकडून मिळालेल्या पैशांतून मालमत्ता विकत घेतली होती. दोन्ही मुलींच्या विवाहाच्या वेळी वडिलांनी कोणत्याही प्रकारचे साहाय्य केले नाही.