कृती दलाच्या मते कला अकादमीच्या नूतनीकरणाची कामे निकृष्ट दर्जाची !

कला अकादमी कृती दलाचे अध्यक्ष विजय केंकरे यांनी कला अकादमीच्या इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामाच्या गुणवत्तेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली असून ‘या कामांना प्राथमिक उत्तीर्णता पूर्ण करण्याएवढेही गुण कृती दलाकडून मिळू शकत नाहीत मी समाधानी नाही.

४ मंदिरांतील चोर्‍यांचा छडा लागला : १२ लाख ८५ सहस्र रुपयांचे साहित्य कह्यात

फोंडा येथील चोरीच्या घटनांचे अन्वेषण करतांना पोलिसांना राज्यातील ४ मंदिरांतील चोर्‍यांचा छडा लागला आहे. या संदर्भातील माहिती दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गोव्यात ‘नरकासुर धमाका’ नावाने बियरची पारितोषिके ठेवणार्‍या लॉटरी कुपनांना विरोध !

‘गोमंतक टीव्ही’च्या आवाहनानंतर आणि गोवा युवा शक्तीच्या प्रत्यक्ष कृतीनंतर ‘आई नवदुर्गा चोडण’ने तिचे लॉटरी कुपन मागे घेतले !

नोकरी देण्याचे आमीष दाखवून पैसे लाटणार्‍यांची गय करणार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा

सरकारी नोकरी पैसे देऊन मिळत नाही. सरकार नोकरभरती पूर्णपणे पारदर्शकपणे राबवते. पैसे घेऊन नोकर्‍या देण्याची भाषा करून काही जण लोकांची फसवणूक करत आहेत.

सरकारला गोव्यात सापडल्या ६० कायदेशीर वारसदार नसलेल्या भूमी

सरकारने यापूर्वी कायदेशीर वारसदार नसलेल्या व्यक्तीच्या निधनानंतर तिची भूमी आणि कायदेशीर वारसदार नसलेली भूमी कह्यात घेण्यासाठी अधिसूचना काढली आहे.

राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने कर्नाटकच्या कळसा प्रकल्पाचा प्रस्ताव पुन्हा नाकारला

राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची ८० वी बैठक ९ ऑक्टोबर या दिवशी झाली. या बैठकीत कर्नाटक सरकारचा काळी आणि सह्याद्री व्याघ्र संरक्षक क्षेत्रांमधील १०.७ हेक्टर भूमी कळसा धरण प्रकल्पाला देण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला.

गोव्यातील मंदिरांमध्ये चोरीच्या वाढत्या घटना

हिंदूबहुल देशात हिंदूंचीच मंदिरे असुरक्षित ! मंदिरातील चोरीच्या वाढत्या घटना पहाता चोरांना पोलिसांचा कोणताच धाक वाटत नाही, हेच लक्षात येते !

राज्यात विविध प्रकल्पांना ग्रामस्थांचा तीव्र विरोध !

थिवी येथील ग्रामसभेत पुणेस्थित खासगी विद्यापीठ प्रकल्पाला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. या प्रकल्पाला विरोध करणारा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे मराठी आणि कोकणी भाषांत मिळतील ! – सरन्यायाधीश चंद्रचूड

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वोच्च न्यायालयातील ३७ सहस्र खटल्यांवरील निवाड्यांचे हिंदीमध्ये भाषांतर झाले आहे. येणार्‍या काळात मराठी आणि कोकणी, तसेच देशातील अन्य भाषांमध्ये या निवाड्यांचे भाषांतर करण्यात येईल, असे उद्गार सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी काढले.