सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे मराठी आणि कोकणी भाषांत मिळतील ! – सरन्यायाधीश चंद्रचूड

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वोच्च न्यायालयातील ३७ सहस्र खटल्यांवरील निवाड्यांचे हिंदीमध्ये भाषांतर झाले आहे. येणार्‍या काळात मराठी आणि कोकणी, तसेच देशातील अन्य भाषांमध्ये या निवाड्यांचे भाषांतर करण्यात येईल, असे उद्गार सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी काढले.

गोव्यात न्यायालयीन अकादमी चालू करा !  – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

गोव्यात आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लवादाचे (आर्बिट्रेशनचे) केंद्र बनवून गोव्याला जागतिक आर्थिक केंद्र बनवूया. यासाठी राज्यात राज्य न्यायालयीन अकादमी चालू करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले आहे.

विश्‍व हिंदु परिषदेचे कोकण प्रांत मंत्री श्री. मोहन सालेकर यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

विश्‍व हिंदु परिषदेचे कोकण प्रांत मंत्री श्री. मोहन सालेकर आणि गोवा विभाग मंत्री श्री. मोहन आमशेकर यांनी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

शिरस्त्राण परिधान न केलेल्या दुचाकीचालकाची अनुज्ञप्ती रहित करणार ! – गोवा पोलीस

शिरस्त्राण परिधान न करता दुचाकी चालवणार्‍यांच्या विरोधात गोवा पोलिसांनी व्यापक मोहीम आरंभली आहे. या अंतर्गत शिरस्त्राण परिधान न करता दुचाकी चालवणार्‍या १०० जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

काणकोण येथील मंदिरांतील चोर्‍यांच्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी

अशी मागणी का करावी लागते ?

मूळ माजोर्डा येथील गोमंतकीय रॅपर ‘अवी ब्रागांझा’ याच्या विरोधात हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद

मस्कत, ओमान स्थित मूळ गोव्यातील माजोर्डा येथील गोमंतकीय रॅपर ‘अवी ब्रागांझा’ याच्या विरोधात गोवा पोलिसांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

काणकोण येथील चावडी बाजारात हिंदूंकडूनही भाजीविक्रीला प्रारंभ

चावडी, काणकोण येथील शनिवारच्या बाजारात दसर्‍याच्या मुहुर्तावर श्री. अजित पै यांनी भाज्या, फळे, फुले यांचे दुकान चालू केले आहे. याद्वारे श्री. अजित पै यांनी एक नवीन पायंडा घालून दिला.

समुद्रकिनारपट्टी भागात तेथील पोलीस ठाण्यांतील ४० टक्के पोलीस गस्त घालणार

गोव्याच्या किनारपट्टी भागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाने रात्रीच्या वेळी गस्त घालणार्‍या पोलिसांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

उच्च न्यायालयाकडून याचिका निकालात प्रा. सुभाष वेलिंगकर यांना अटकपूर्व जामीन संमत

या प्रकरणी हस्तक्षेप याचिका प्रविष्ट करणार्‍यांकडून प्रा. वेलिंगकर हे डिचोली पोलीस ठाण्यात चौकशी अधिकार्‍यांसमोर उपस्थित राहिल्याने त्यांना अटक करणे आणि अटकपूर्व जामीन देणे, याचा प्रश्नच येत नाही, असा युक्तीवाद करण्यात आला.

कळंगुट (गोवा) येथे तरुणींची छेड काढणार्‍याला प्रथम तरुणींनी आणि नंतर ग्रामस्थांनी चोपले !

दांडिया नृत्य संपवून घरी परतणार्‍या ३ मुलींची छेड काढणारे पर्यटक आणि त्यांच्यासमवेत असलेला दलाल यांना चोप देण्याची घटना १२ ऑक्टोबर या दिवशी पोरबावाडा, कळंगुट येथे घडली.