आसाममध्ये ५ आतंकवाद्यांना अटक

आसाम पोलिसांनी बांगलादेशातील एका आतंकवादी संघटनेच्या ५ जणांना अटक केली आहे. या संघटनेचे संबंध अल् कायदाशी आहेत. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी घाला !  

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची केंद्र सरकारकडे मागणी

आसाममध्येही संस्कृती आणि परंपरा यांच्या विरोधातील नावे पालटली जाणार !

आसाम सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! प्रत्येक राज्याने आणि केंद्र सरकारनेही या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !

आसमच्या बांगलादेश सीमेवर गोवंशांची तस्करी करणार्‍यांकडून सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर आक्रमण

गोवंशांची तस्करी करणारे कालपर्यंत गोरक्षक आणि पोलीस यांच्यावर  आक्रमण करत होते, आता ते सैनिकांवरही आक्रमण करण्याचे धाडस करत आहेत. हे पहाता अशांना फाशीचीच शिक्षा करण्याचा कायदा करणे आवश्यक आहे !

सरकारी मदरसे धर्मिक शिक्षण देऊ शकत नाहीत ! – गौहत्ती उच्च न्यायालय

सरकारी मदरशांना सामान्य शाळांमध्ये परावर्तीत करण्याच्या आसाम राज्य सरकारच्या निर्णयाचे समर्थन

राज्यात कुणालाही वैयक्तिक सुरक्षा पुरवावी लागू नये, अशी स्थिती निर्माण करणार !

अशा प्रकारचा विश्‍वास सध्याच्या काळात बाळगणार्‍या सरमा यांना शुभेच्छा; मात्र केवळ आसाममध्येच नव्हे, तर संपूर्ण देशात गेल्या ७४ वर्षांत अशी स्थिती निर्माण होऊ शकली नाही, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे, हेही तितकेच सत्य आहे !

सिलचर (आसाम) येथे नाताळच्या कार्यक्रमात हिंदु तरुण-तरुणी यांनी सहभागी होण्यास काही लोकांचा विरोध

आसाममधील सिलचर येथे २५ डिसेंबरच्या रात्री नाताळ साजरा करत असतांना काही जणांनी त्याला विरोध केला. त्यांनी हा कार्यक्रम बंद करण्याची मागणी केली. या प्रकरणी कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, असे पोलिसांनी सांगितले.

आसाममध्ये गोतस्करांची संपत्ती जप्त करणारे विधेयक संमत !

गोहत्या आणि गोतस्करी यांच्या संदर्भात केंद्र सरकारने कठोर कायदा केला, तर देशातील राज्यांना वेगवेगळा कायदा करण्याची आवश्यकता भासणार नाही ! केंद्र सरकारने असा कायदा लवकरात लवकर करावा, असेच हिंदूंना वाटते !

(म्हणे) ‘मोगल शासकांनी देशातील अनेक मंदिरांसह कामाख्या मंदिरालाही भूमी दान केली होती !’ – आसाममधील आमदार अमिनुल इस्लाम यांचा दावा

अशा प्रकारचा खोटा इतिहास सांगून खरा इतिहास खोटा ठरवण्याचा प्रयत्न धर्मांध करत आहेत. याला ‘इतिहास (हिस्ट्री) जिहाद’ म्हणायचे का ?

आसामध्ये आम्ही अनुमाने ७०० मदरसे बंद केलेत, तर उर्वरित मदरशांमध्ये शाळा आणि महाविद्यालय चालू करणार ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसाममधील भाजपच्या सरकारचे मुख्यमंत्री असे करू शकतात, तर देशातील अन्य भाजपशासित राज्यांतही असे करायला हवे, असेच हिंदूंना वाटते !