इस्लामी अर्थव्यवस्थेचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम !

२४ जून २०२४ या दिवशीपासून श्री रामनाथ देवस्थान, गोवा येथे चालू होत असलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या निमित्ताने…

१. भारतातील रोख अर्थव्यवस्था मुसलमानांच्या कह्यात !

मी गेल्या २५ वर्षांपासून हिंदु राष्ट्रासाठी अर्थशास्त्राच्या माध्यमातून एक जनजागृती अभियान चालवत आहे. काश्मीरमध्ये केशरची शेती होते. ही शेती सर्वाधिक लाभदायक असते. केशरच्या शेतीमुळे मुसलमानांच्या हातात संपूर्ण काश्मीरची अर्थव्यवस्था आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सफरचंदाचे सर्वाधिक उत्पादन होते. पंजाबमध्ये अनिवासी भारतीय बाहेरून सोने घेऊन येतात आणि ते विकतात. राजस्थानमध्ये खाण व्यवसायाचे काम जगात सर्वाधिक होते. उत्तरप्रदेशमध्ये गुटखा आणि पान मसाला यांचे उद्योग आहेत. महाराष्ट्रात तंबाखूची पाने आणि केळी, तर गुजरातमध्ये ज्वलनशील तेलाचा कारभार चालतो. कर्नाटकमध्ये चंदनाच्या लाकडाचे काम करणारे लोक आहेत. केरळमध्ये नारळाचा व्यापार चालतो. या सर्व रोख अर्थव्यवस्था असून त्या सर्व मुसलमानांच्या कह्यात आहेत.

श्री. ऋषि वशिष्ठ यांचा परिचय

श्री. ऋषि वशिष्ठ

देहलीचे श्री. ऋषि वशिष्ठ हे ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ आहेत. अर्थशास्त्राच्या माध्यमातून देश-विदेशाची आर्थिक नीती ठरवण्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. ते ‘पेटेल फायनान्शिअल टेक्नॉलॉजीज आस्थापना’चे संचालक अध्यक्ष आहेत. ते उद्योजक असून गेल्या २५ वर्षांपासून व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत आहेत. यासमवेतच ते भारतीय जनता पक्ष व्यापारी विभागाच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य आहेत. राष्ट्र आणि धर्म यांसाठी समर्पित कार्य करत असल्यामुळे त्यांना वर्ष २००९ मध्ये अमेरिकेत विषप्रयोग करून ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. परिणामी त्यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली आहेत. त्यांच्या पत्नीने त्यांना एक मूत्रपिंड दान केले आहे. ते अर्थशास्त्राच्या माध्यमातून भारतात हिंदु राष्ट्र आणण्यासाठी कार्यरत आहेत.

२. सर्वव्यापक सनातन संस्कृतीकडून सर्व धर्म आणि भाषा यांना सन्मान

सनातन म्हणजे शाश्वत ! आर्य चाणक्य यांनी अर्थशास्त्रात ३ गोष्टी सांगितल्या आहेत, ‘भाव, स्वभाव आणि अभाव !’ आपल्या सर्वांचा भाव सनातनी आहे. आपण जन्माने आणि स्वभावाने सनातनी आहोत. ज्या मुद्रेवर (चलनावर) छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंद सिंह असायला पाहिजे होते, त्यावर आज मोहनदास गांधी विराजमान आहेत. आपण या मुद्रेचा प्रतिदिन उपयोग करत असतो. आपली सनातन संस्कृती प्रेम, करुणा आणि परोपकार अशा गुणांचा मानवी हृदयात साठा करून ठेवते. जगातील प्रत्येक देश त्यांची संस्कृती, धर्म, भाषा यांना त्यांच्या पद्धतीने संकुचित आवाक्यात ठेवतात. आपल्या सनातन संस्कृतीने संकुचित दृष्टीकोनाचा त्याग करून समस्त धर्म आणि भाषा यांना आवश्यक सन्मान दिला आहे.

३. मुसलमानांच्या लोकसंख्या वाढीमागे षड्यंत्र 

स्वातंत्र्यानंतर देशात मुसलमानांच्या लोकसंख्येत सातत्याने वाढ होत चालली आहे. ही वाढ अर्थशास्त्राच्या माध्यमातून समजून घ्यावी लागेल. एका गावात लोकसंख्येचे सर्वेक्षण होते. तेथे एक माणूस असतो. त्याच्यासह त्याच्या बुरखा घातलेल्या ३ बायका आणि ८ मुले यांची नोंदणी होते. पुढच्या घरात गेलो, तर तेथेही ३ बायका आणि ८ मुले असतात. अशा प्रकारे ज्या गावाची लोकसंख्या ७०० ते ८०० असते, तेथे आता २ सहस्र ते २ सहस्र ५०० एवढी लोकसंख्या दाखवली जाते. त्याच प्रमाणात तांदूळ, डाळ आणि अन्न त्यांना दिले जाते. ही जी मुसलमानांची वाढती लोकसंख्या आपल्याला दिसते, ती अर्थशास्त्राच्या माध्यमातून आपल्या खिशातून अधिक पैसा काढून घेते. त्यांना काम न करता केवळ संख्या दाखवून रोजगार दिला जातो. हे सनातन धर्माच्या विरोधातील एक प्रकारचे एक षड्यंत्रच आहे.

४. ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेसाठी पुरुषार्थाचे महत्त्व

आर्य चाणक्य म्हणतात, ‘प्रलय आणि निर्माण ब्राह्मणाच्या पदरात पडते.’ ते पुढे म्हणतात, ‘ज्या महिला आणि पुरुष यांनी त्यांचे कौमार्य वयाच्या २६ वर्षांपर्यंत जपून ठेवले, त्याला ‘ब्राह्मण’ म्हटले जाईल. ज्याने २३ वर्षांच्या वयापर्यंत कौमार्य जपून ठेवले, त्याला ‘क्षत्रिय’ म्हटले जाईल. ज्याने २० वर्षांपर्यंत कौमार्य जपून ठेवले, त्याला ‘वैश्य’ म्हटले जाईल आणि ज्याने १३ अन् १५ वर्षांचे असतांना कौमार्य घालवले, त्याला ‘शूद्र’ म्हटले जाईल.’ त्यामुळे ज्यांना त्यांच्या मुलांना ब्राह्मण बनवायचे आहे, त्यांना अर्धवेळ ‘हिंदु राष्ट्र’ हवे कि पूर्ण वेळ ‘हिंदु राष्ट्र’ हवे ? याचा निर्णय घ्यायचा आहे.

५. हिंदूंसाठी मोहनदास गांधी यांचे चित्र नसलेली स्वतंत्र वैदिक सनातनी मुद्रा आवश्यक !

हिंदु पूजेमध्ये भारतीय चलन ठेवतात. खरे तर आपण स्वतंत्र वैदिक सनातनी मुद्रा चलनात आणली पाहिजे. विशेषत: त्याची सर्वांच्या घरात पूजा होईल, तसेच आपण करत असलेल्या पूजेचाही आपल्याला लाभ होईल. यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी त्वरित पावले उचलावीत. प्रत्येक जिल्ह्यात एका मोठ्या सोनाराला स्वामित्वाच्या (‘रॉयल्टी’च्या) स्वरूपात नेमावे, जेथे त्याची खरेदी आणि विक्री होईल. जोपर्यंत सरकार आणि राजकीय पक्ष यांना दुर्लक्षित करून आपण असे निर्णय घेऊन आपली शक्ती दाखवत नाही, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांची मुद्रा चलनावर येणार नाही. प्रत्यक्ष असलेल्या गोष्टीला प्रमाणाची आवश्यकता नसते. सनातन हिंदु धर्माला मुळासह नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अर्थशास्त्राच्या दृष्टीने आपले सण, उत्सव, पूजा यांमध्ये जोपर्यंत वैदिक सनातनी मुद्रेचा वापर करणार नाही, तोपर्यंत ही लढाई कल्पनेतच राहील. धर्म आणि संस्कृती यांना सुरक्षित करण्यासाठी आपल्याला हा निर्णय घ्यावा लागेल.

६. स्वदेशी चळवळीमुळे भारत जागतिक उत्पादने आणि स्पर्धा यांच्यातून बाहेर

आपण विशेषरूपाने सनातनी संघर्ष पुढे वाढवत आहोत; परंतु ९७ टक्के लोक या संघर्षात केवळ अर्पण देऊन सहभागी होऊ इच्छितात. त्या सनातनी संघर्षाला आपल्याला एका सूत्रात बांधावे लागेल. ज्या प्रकारे आज जग युद्ध लढत आहे, ते केवळ अर्थशास्त्र आहे. भारतियांना स्वदेशीचा अंगीकार करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यासाठी ‘स्वदेशी जागरण मंचा’ची स्थापना करण्यात आली. स्वदेशी आंदोलन उभे करण्यात आले. त्यात आपण सर्व सहभागी झालो. याकडे गांभीर्याने पाहिल्यावर असे लक्षात येते की, ‘स्वदेशी जागरण मंचा’च्या माध्यमातून आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापारातून बाहेर ठेवण्यात आले. जेव्हा आपण ‘स्वदेशी जागरण मंचा’ची गोष्ट बोलत होतो, तेव्हा चीन ‘इंटरनॅशनल ग्लोबल प्रोटेक्स’विषयी (आंतरराष्ट्रीय जागतिक संरक्षणाविषयी) बोलत होता. २० वर्षांपूर्वी स्वदेशीच्या माध्यमातून आपल्याला ‘जागतिक उत्पादने आणि जागतिक स्पर्धा’ यांतून बाहेर करण्यात आले.

७.‘लव्ह जिहाद’वर नियंत्रण मिळवण्यासाठी विवाहाच्या स्वतंत्र संकेतस्थळांची आवश्यकता !

जोपर्यंत आपण धर्मांधांच्या १०० पावले पुढे जाणार नाही, तोपर्यंत ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतर’ यांसारख्या समस्यांशी झुंजत रहाणार आहोत. ज्या लोकांनी तलवारीच्या भीतीने मुसलमान पंथ स्वीकारला, ते आपलेच लोक होते. ‘लव्ह जिहाद’ आणि ‘भूमी जिहाद’ यांचा अभ्यास करून त्यांच्याविषयी राष्ट्रीय स्तरावर निर्णय घ्यावा लागेल. ‘शादी डॉट कॉम’पासून विवाहाविषयी जेवढ्या ‘मेट्रोमनी साईट (संकेतस्थळे)’ आहेत, त्यांची ९८ टक्के मालकी ही त्या व्यक्तींजवळ आहे, जे सौदी अरेबिया आणि अन्य इस्लामी देश येथून ती संकेतस्थळे चालवतात. त्या संकेतस्थळांवर आपली मुले आणि मुली यांची माहिती ठेवली जाते. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’ला थांबवणे आपल्या क्षमतेच्या बाहेर आहे. त्यासाठी आपल्याला स्वतंत्र संकेतस्थळे बनवावी लागतील. आपल्या लोकांसाठी त्यावर काम करावे लागेल. तेव्हाच आपण ‘लव्ह जिहाद’ला समूळ नष्ट करू शकणार आहोत. धर्म, साहित्य, पुराण, उपनिषद, रामायण, महाभारत, गीता हा आपल्या पूर्वजांचा वारसा आहे आणि आज आपली मुले काय शिकत आहेत ? जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंद सिंह हे भारतीय नाण्यावर येणार नाहीत, तोपर्यंत हा संघर्ष चालू राहील. या संघर्षात सर्वांनी तन, मन आणि धन यांच्या माध्यमातून सहभागी झाल्यास आपण ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करू शकणार आहोत.’

– श्री. ऋषि वशिष्ठ, ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ तथा संचालक अध्यक्ष, ‘पेटेल फायनान्शिअल टेक्नॉलॉजीज’, देहली.