S Jaishankar Target China : भारतासमवेतचा दीर्घकालीन लेखी करार कायम ठेवण्यात चीन अपयशी ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

नवी देहली – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी पुन्हा एकदा चीनचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे. मलेशियाच्या राजधानीत भारतीय प्रवासी लोकांशी संवाद  साधतांना ते बोलत होते. भारत-चीन संबंधांच्या सद्यःस्थितीविषयी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना जयशंकर म्हणाले, ‘‘भारतियांप्रती माझे पहिले कर्तव्य म्हणजे सीमेचे रक्षण करणे आणि मी याविषयी कधीही तडजोड करू शकत नाही. चीन भारतासमवेत दीर्घकालीन लेखी करार कायम ठेवण्यात अपयशी ठरला आहे.’’

जयशंकर पुढे म्हणाले की,

१. चीनसमवेतचे द्विपक्षीय संबंध पुढे नेण्यासाठी नियंत्रणरेषेजवळ सैन्य नियुक्त करणे, ही पूर्वअट असेल.

२. प्रत्येक देशाला आपल्या शेजार्‍यांशी चांगले संबंध हवे आहेत; पण प्रत्येक संबंध हा कोणत्या ना कोणत्या आधारावर प्रस्थापित करावा लागतो. आमची चीनशी अजूनही चर्चा चालू आहे.

३. भारत आणि चीन यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर सैन्य न आणण्याची आपल्याकडे परंपरा आहे. दोन्ही देशांचे सैन्यतळ काही अंतरावर आहे, जे सैन्याच्या तैनातीचे पारंपरिक ठिकाण आहे.

४. जून २०२० मध्ये गलवान खोर्‍यामध्ये झालेल्या प्राणघातक संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्यातील संबंध तणावपूर्ण बनले आहेत.