राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ३.११.२०२१

प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

छत्रपती शिवरायांच्या नीतीचे अनुकरण करत ‘हिंदु राष्ट्र’ बनवण्यासाठी संघटित व्हा ! – प्रमोद मुतालिक, अध्यक्ष, श्रीराम सेना

मोगलांच्या अत्याचारांनी जनता पिडली होती, महिलांवर अत्याचार होत होते, त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी बालवयातच सामान्य जनता, कष्टकरी, शेतकरी यांना संघटित करून त्यांचे सैन्य निर्माण केले. त्यांच्यात देव, देश अन् धर्म यांच्या रक्षणासाठी स्वाभिमान निर्माण केला. त्यातूनच पुढे तानाजी, सूर्याजी यांच्यासारखे शूरवीर घडले. चातुर्य आणि युद्धकौशल्य यांच्या बळावर त्यांनी हिंदूंचे राष्ट्र स्थापन केले. आज आपल्यालाही त्याच नीतीचे अनुसरण करावे लागणार आहे; कारण आज कट्टरपंथीय जिहादी, ख्रिस्ती मिशनरी, राष्ट्रविरोधी साम्यवादी आणि भ्रष्टाचारी यांचे भारतावर आक्रमण चालू आहे. त्याला एकच उत्तर आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मार्ग ! शिवछत्रपतींच्या नीतीचे अनुसरण करून देशाला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी आपल्या सर्वांना संघटित व्हावे लागणार आहे.


चित्रपट आणि मालिका यांमधून शिवचरित्राचे प्रसंग दाखवतांना मुसलमानांचे उदात्तीकरण करणे, हा विकृत इतिहास पसरवण्याचा निंदनीय प्रयत्न ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मांतर करणार्‍या पाद्र्यांचा शिरच्छेद केला. धर्मांतरितांचे शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा हिंदु धर्मात सामावून घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेमध्ये केलेल्या भाषणातही ‘हिंदूंच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे शिवाजी महाराज’ असा उल्लेख केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे खर्‍या अर्थाने हिंदु राजे असतांना सध्या मालिका, चित्रपट यांमधूनही शिवचरित्रातील प्रसंग दाखवतांना मुसलमानांचे उदात्तीकरण केले जाते. हा विकृत इतिहास पसरवण्याचा निंदनीय प्रयत्न आहे.


आपण भारतात जन्मलो,या संस्कृतीत वाढलो, याचा प्रत्येक भारतियाला अभिमान असला पाहिजे !

 

योगऋषी रामदेवबाबा

‘जगाला पहिली भाषा, अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, गणित, संस्कृती, आरोग्यशास्त्र आणि सर्वच भारताने शिकवले. आपली संस्कृती एवढी प्राचीन असतांना आपण मात्र सध्या इतर देशांकडे पहातो. २०० वर्षांपूर्वी ‘ॲलोपॅथी’ अस्तित्वात नव्हती, तेव्हा कोणते उपचार केले जात होते ? जग आपल्याकडे शिकायला येते. त्यामुळे आपण या देशात जन्मलो, या संस्कृतीत वाढलो, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.’

– योगऋषी रामदेवबाबा (२९.४.२०११)