‘महर्षींच्या आज्ञेने रामनाथी आश्रमात विविध यज्ञ होतात. गेल्या काही यज्ञांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. नीलेश सिंगबाळ आहुती देण्यासाठी बसले होते. त्या वेळी ते नेसणार असलेले सोवळे आणि उपरणे यांना काही दिवस इस्त्री करण्याची संधी देवाच्या कृपेने मला मिळाली. तेव्हा मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.
१. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचे सोवळे-उपरणे

अ. उपरण्याला इस्त्री करतांना प्रतिदिन त्यातून सुगंध दरवळत असल्याचे मला जाणवायचे. तो सुगंध मला उपरण्यापासून १.५ मीटर अंतरापर्यंत येत असे आणि इस्त्री करतांना त्या सुगंधात उत्तरोत्तर वाढ होत असे.
आ. सोवळ्याला इस्त्री करतांनाही १.२ मीटर अंतरापर्यंत सुगंध दरवळत असे. सोवळे इस्त्री करतांना ‘मी एका निर्गुण पोकळीत आत आत जात आहे’, असे मला जाणवायचे. याचा अर्थ सोवळे उपरण्याच्या तुलनेत निर्गुण स्तरावर कार्य करत असल्याचे मला जाणवले.
इ. मी सोवळे आणि उपरणे इस्त्री करण्यापूर्वी प्रार्थना करून काही वेळ श्रीविष्णु, काही वेळ श्री सिद्धिविनायक आणि काही वेळ श्री भवानीदेवी यांचा नामजप करत असे; पण श्री सिद्धिविनायक आणि श्री भवानीदेवी यांचा नामजप करतांना अनुमाने २ – ३ मिनिटांनी त्या देवतांच्या नामजपाऐवजी श्रीविष्णूचाच नामजप माझ्याकडून होत असे, तसेच माझ्याकडून श्वासही दीर्घ घेतला जात असे. दीर्घ श्वास घेतला जाणे, म्हणजे शांती अनुभवणे.
ई. सोवळे आणि उपरणे यांच्यामध्ये सोवळे कापसासारखे हलके, तर उपरणे जड जाणवायचे. उपरणे जड जाणवण्याविषयी लक्षात आले की, सद्गुरु गाडगीळकाका यज्ञाला बसल्यावर त्यांच्यावर सूक्ष्मातील वाईट शक्तींकडून सतत आक्रमण होत असते. हे आक्रमण उपरण्याच्या माध्यमातून रोखले जाते. (शास्त्रानुसार पूजेच्या वेळी पूजनकर्त्याची सूर्यनाडी कार्यरत रहाण्यासाठी उपरणे परिधान केले जाते. – संकलक) त्यामुळे ते (शक्तीचे प्रमाण अधिक असल्याने) जड लागत होते. असे असले तरी त्यातून खूप सुगंध येत होता.
उ. सद्गुरु गाडगीळकाका वापरत असलेले सोवळे इस्त्री करतांना प्रतिदिन माझ्यावर नामजपादी उपाय होत होते आणि वाईट शक्तींमुळे आलेले माझ्यावरील आवरण नष्ट होत होते.
२. पू. नीलेश सिंगबाळ यांचे सोवळे-उपरणे
अ. पू. नीलेश सिंगबाळ यांचे सोवळे आणि उपरणे इस्त्री करतांना कापरासारखा सुगंध यायचा. त्यावरून पू. नीलेश सिंगबाळ यांच्यामध्ये शिवतत्त्व असल्याचे जाणवले. हा सुगंध १ मीटर अंतरापर्यंत जाणवत असे.
आ. पू. नीलेशदादांचे उपरणेही सद्गुरु गाडगीळकाकांच्या उपरण्याप्रमाणे जड, तर सोवळे हलके जाणवत असे.’
– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(११.१.२०२१)
|
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !