अल्पसंख्यांकांच्या दबावाखाली येऊन भारताला हिंदु राष्ट्र घोषित करता येत नसेल, तर भाजपने हिंदु प्रदेश निर्माण करावा ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

मुंबई – अल्पसंख्याकांच्या दबावाखाली येऊन जर भाजप आपल्या देशाला हिंदु राष्ट्र घोषित करत नसेल, तर भाजपने हिंदु सुरक्षित राज्य अर्थात् हिंदु प्रदेश निर्माण करावा, असे आवाहन महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी केले. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पनवेल येथील राणा सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे नेते किरण सोनवणे होते. या कार्यक्रमाला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी अटलबिहारी बाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

सेंगर पुढे म्हणाले, काश्मीरमध्ये हिंदू अल्प झाल्यावर त्यांच्यावर प्रचंड अत्याचार झाले. त्यांची संपत्ती लुटण्यात आली, याची उदाहरणे समोर आहेत. इस्लाम धर्मियांची संख्या वाढत आहे. त्याला वेसण घालण्यासाठी देशात समान नागरी कायदा त्वरित आणावा.