ब्रिटनमध्ये वर्ष २००५ मध्ये १३ वर्षीय मुलीवर इमामाकडून मशिदीमध्ये बलात्कार

इमामावर खटला चालू; मात्र त्याने आरोप फेटाळले

अशा घटनांविषयी भारतातील निधर्मी प्रसारमाध्यमे गांधीजींच्या माकडांप्रमाणे वागतात !

इमाम खन्दाकेर मोहम्मद रहमान

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनच्या साऊथ वेल्स येथे वर्ष २००५ मध्ये एका १३ वर्षांच्या विद्यार्थिनीवर मशिदीमध्ये इमाम खन्दाकेर मोहम्मद रहमान या ५० वर्षीय इमामाने शौचालयात बलात्कार केला होता. या घटनेविषयी वर्ष २०१८ मध्ये जेव्हा या मुलीने तिच्या नवर्‍याला माहिती दिली, तेव्हा त्याने पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर ही घटना उघड झाली. आता या इमामावर न्यायालयामध्ये खटला चालू झाला आहे.


ही मुलगी मशिदीमध्ये धार्मिक वर्गामध्ये गेली होती. तेव्हा या इमामाने तिला पुस्तक देण्याच्या बहाण्याने शौचालयात नेले आणि कुकर्म केले होते. या घटनेनंतरही जेव्हा ही मुलगी मशिदीमध्ये येत असे, तेव्हा हा इमाम तिचा विनयभंग करत असे. त्यामुळे नंतर या मुलीने मशिदीमध्ये जाण्याचे टाळले होते.