वर्ष २००८ मध्ये मुंबईत झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर ‘बीसीसीआय’च्या (भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या) कणखर धोरणामुळे सुरक्षेच्या कारणास्तव भारत-पाकिस्तान या देशांत कोणतीही द्विपक्षीय क्रिकेट स्पर्धा खेळवली जात नाही. जागतिक क्रिकेट क्षेत्रात ‘बीसीसीआय’चे वर्चस्व आहे. ‘बीसीसीआय’ने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्याने आणि त्यावर शेवटपर्यंत ठाम राहिल्याने ‘पाकिस्तान क्रिकेट मंडळा’ला नाईलाजास्तव माघार घ्यावी लागली. त्यामुळे ही स्पर्धा दोन्हीकडे, म्हणजे पाकिस्तान आणि दुबई येथे आयोजित करावी लागली. त्यांना भारताचे सर्व सामने पाकऐवजी दुबईत आयोजित करावे लागले. यामुळे पाकिस्तानची जगात नाचक्की झाली. त्यातच या स्पर्धेत एकाही सामन्यात विजय मिळवू न शकल्याने त्यांना पराभव पचवणे अवघड जात आहे.
गेल्या काही वर्षांत मोठ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये जेव्हा जेव्हा भारत-पाक सामना असतो, तेव्हा क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता असते. बहुतांश वेळा सामन्यात भारताचाच विजय होतो; मात्र त्यानंतर देशभरात जेव्हा विजयाचा आनंद साजरा केला जातो, मिरवणुका काढल्या जातात, ‘वन्दे मातरम्’ आणि ‘भारतमाता की जय’च्या घोषणा दिल्या जातात, तेव्हा चवताळलेल्या आणि उन्मत्त धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमणे केली जातात. मोठ्या प्रमाणात दगडफेक करणे, गाड्यांची, तसेच सार्वजनिक मालमत्तेची हानी करणे, जाळपोळ करणे, शस्त्रास्त्रांद्वारे आक्रमणे करणे इत्यादींद्वारे हिंदूंना नेहमीच मार सहन करावा लागतो. ९ मार्च या दिवशीही भारताने ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’च्या अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय क्रिकेटप्रेमींकडून मध्यप्रदेशातील इंदूर शहरातील महु शहरात काढलेल्या मिरवणुकीच्या वेळी मशिदीतील धर्मांधांकडून आक्रमण करण्यात आले. त्याच दिवशी गुजरातमधील गांधीनगर येथील दहेगावमध्ये काढलेल्या मिरवणुकीवरही मशिदीच्या परिसरात आक्रमण करण्यात आले. महु येथे ज्या मशिदीतून मिरवणुकीतील हिंदूंवर आक्रमण करण्यात आले, त्या मशिदीचे मौलवी महंमद जाबीर यांनी
‘मिरवणूक मशिदीजवळून का नेली ? त्यासाठी कुणाची अनुमती घेतली होती ? हिंदूंकडूनच बाँब फोडण्यात आल्याने मशिदीतूनही आक्रमण करण्यात आले’, असा धादांत खोटा कांगावा केला. यावरून त्यांची हिंदुद्वेषी आणि भारतद्वेषी मानसिकता लक्षात येते. त्यांचे बोलणे न समजण्याइतके हिंदू दुधखुळे नाहीत; परंतु सातत्याने मशिदीतून होणारी आक्रमणे हे धर्मांधांचे सुनियोजित षड्यंत्र आहे, हे समजून घेऊन ते हाणून पाडण्यासाठी आणि धर्मांधांचा उद्दामपणा रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने प्रयत्न करायला हवेत. सरकारनेही याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे !
– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.