फ्रान्समधील ‘त्या’ शाळेला ‘सर्वांना ठार करू’ अशी धर्मांधांकडून धमकी

धार्मिक भावना दुखावल्यावर असहिष्णु धर्मांध कायदा हातात घेतात, तर सहिष्णु हिंदू साधा निषेधही नोंदवत नाहीत !

पॅरिस (फ्रान्स) – काही आठवड्यांपूर्वी फ्रान्समध्ये एका शाळेमध्ये सॅम्युअल पॅटी या शिक्षकाने ‘शार्ली हेब्दो’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेली महंमद पैगंबर यांच्यावरील व्यंगचित्रे विद्यार्थ्यांना दाखवली होती. त्यामुळे एका धर्मांध विद्यार्थ्याने त्या शिक्षकाचा शिरच्छेद करत हत्या केली. यानंतर आता पुन्हा एकदा या शाळेतील सर्वांना ठार करण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भातील एक पत्र शाळेला मिळाले आहे. यात ‘तुम्ही सर्व मारले जाल. सॅम्युअल पॅटी.. अल्ला हू अकबर’, असे लिहिले आहे. तसेच अन्य २ शाळांनाही अशाच प्रकारची धमकी देण्यात आली आहे.