लस येण्यापूर्वी कोरोनामुळे जगभरात २० लाख मृत्यू होऊ शकतात ! – जागतिक आरोग्य संघटनेची भीती

जिनेव्हा (स्वित्झर्लंड) – सध्याच्या घडीला जगभरात कोरोनाची बाधा झालेले रुग्ण हे ३ कोटी २० लाखांपेक्षा अधिक आहेत. कोरोनाचा प्रतिबंध करणारी लस बाजारात येण्याआधी जगभरात २० लाख कोरोनाबाधितांचे मृत्यू होऊ शकतात, अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे.

कोरोनाची बाधा होऊन आजवर अमेरिकेत २ लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर भारतात ९३ सहस्रांंपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्राझिलमध्ये ४० सहस्रांंपेक्षा अधिक, रशियात २० सहस्रांंपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत ७० लाखांपेक्षा अधिक रुग्ण आहेत, तर भारतात एकूण रुग्णांची संख्या ५९ लाखांवर पोचली आहे.