गणेश नाईक यांना अटक करून पुढील कारवाई केली जाईल ! – सौ. रूपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग
ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात एका महिलेने राज्य महिला आयोगाकडे ई-मेलद्वारे तक्रार केली होती. याची गंभीर नोंद घेऊन राज्य महिला आयोगाने नवी मुंबई पोलिसांना अन्वेषण करून ४८ घंट्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.