जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !

(दर्गा म्हणजे मुसलमानांचे प्रार्थनास्थळ)

प्रतिकात्मक चित्र

जळगाव – येथील जामनेर-पाचोरा महामार्गावरील घोडेस्वार पीर बाबा दर्ग्यावर प्रशासनाने कारवाई करत ते अतिक्रमण भुईसपाट केले. महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामात हा दर्गा अडथळा ठरत होता. या दर्ग्याच्या माध्यमातून अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रकार करून नागरिकांची फसवणूक होत असल्याचा आरोप केला जात होता. (असे प्रकार करणार्‍या संबंधितांविरोधात तक्रार प्रविष्ट करून त्यांनाही कठोर शिक्षा व्हायला हवी ! – संपादक)

या पार्श्वभूमीवर ‘पाचोरा, शेंदुर्णी, जामनेर भागात अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेले उर्वरित दर्गे आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हावी’, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. (अशी मागणी करण्याची वेळ का येते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? – संपादक)

संपादकीय भूमिका

राज्यातील सर्वच अनधिकृत दर्ग्यांवर अशी कारवाई व्हायला हवी !