२३ आणि २४ जूनला मंदिर दर्शनासाठी बंद !
मूर्तीवर रासायनिक लेपन करणार कि नाही ?, याविषयी अद्यापही अस्पष्टता !

पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणीदेवीच्या मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, राज्य पुरातत्व विभाग, तसेच मूर्ती संवर्धन क्षेत्रातील तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. प्राप्त तांत्रिक मार्गदर्शन आणि शिफारसी यांच्या आधारे २२ ते २४ जून या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीच्या मूर्तीचे संवर्धनाचे काम करण्यात येणार आहे. या संवर्धनाच्या कामासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया सुरक्षितपणे पूर्ण करता यावी, तसेच मूर्तीच्या पावित्र्याचे रक्षण करता यावे, यांसाठी २३ आणि २४ जून हे २ दिवस श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती’चे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. मूर्तीवर रासायनिक लेपन करणार कि नाही ?, याविषयी मात्र अद्यापही अस्पष्टता आहे. रासायनिक लेपनाला वारकरी संप्रदाय, महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदुत्वनिष्ठ संघयना यांचा विरोध आहे. (मूर्तीचे संवर्धन करणार म्हणजे नेमके काय करणार ?, याची माहिती भाविकांना अगोदर कळली पाहिजे. तसेच संवर्धन करण्यापूर्वी प्रशासनाने धर्माचार्चांचे मार्गदर्शन घेतले आहे का ?, हेही स्पष्ट झाले पाहिजे ! – संपादक)
यापूर्वी वर्ष १९८८, २००५, २०२० आणि २०२२ या कालावधीत मूर्तीचे संवर्धन करण्यात आले होते. मागील संवर्धनास अनुमाने ५ वर्षांचा कालावधी झाल्याने मूर्तीच्या काही भागांची नैसर्गिक झीज झाल्याचे दिसून आले आहे. मूर्तीतील सूक्ष्म छिद्रे आणि झिजलेल्या भागांची दुरुस्ती करण्यासाठी, तसेच मूर्तीचे आयुष्यमान वाढवण्यासाठी संरक्षक आवरण देण्यात येणार आहे. सदरची संपूर्ण प्रक्रिया भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, छत्रपती संभाजीनगर आणि राज्य पुरातत्त्व विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
आषाढी यात्रेसाठी ११ लाख बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती ! – राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी