पुण्यातील विषारी दारूचे प्रकरण

पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात हातभट्टीवरील विषारी दारू प्यायल्याने झालेल्या मृत्यू प्रकरणाचे अन्वेषण आता गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अधिक तीव्र केले आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी सुमारे २० संशयितांच्या शोधासाठी गुन्हे अन्वेषण विभागाने ५ विशेष पथके सिद्ध केली आहेत. आतापर्यंत ११ आरोपींना कह्यात घेतले असून, अन्वेषणाच्या कालावधीत त्यांचे भ्रमणभाष आणि तांत्रिक पुरावे फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आरोपींच्या ‘कॉल रेकॉर्ड’चे (कॉल डिटेल रेकॉर्ड – सी.डी.आर्) विश्लेषण आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे काम सध्या वेगाने चालू आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणातील संपूर्ण पुरवठा साखळी उघड करण्यासाठी विविध पातळ्यांवर अन्वेषण चालू केले असून नागरिकांना माहिती देण्यासाठी दापोडी आणि हडपसर येथे ‘साहाय्य केंद्रे’ चालू करण्यात आली आहेत.
शालार्थ आयडी मान्यतेसाठी अधिकार्यांना १५ दिवसांची मुदत !
छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार करणार्या शिक्षकाला अटक !
गुटखा तस्करांवर थेट ‘मकोका’: मुख्य सूत्रधारांचे नेटवर्क उद्ध्वस्त करणार !
मांगेली परिसरात पहिल्याच पावसात उच्च दाबाच्या वीजवाहिनीचे खांब वाकले
मेटावाडा, कुळे येथे दूधसागर नदीत बुडून ४ जणांचा मृत्यू
अवैधरित्या खतांची निर्मिती आणि विक्री करणारे यांच्यावर गुन्हा नोंद