पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !

सोलापूर – विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. ‘तीर्थक्षेत्र विकास आघाडी’च्या १३ पैकी ९ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेचे नेते श्री. अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली या नगरसेवकांनी पालकमंत्री श्री. जयकुमार गोरे यांची भेट घेतली. या नगरसेवकांनी भाजपचे उमेदवार श्री. राजेंद्र राऊत यांना पाठिंबा देण्याची भूमिका स्पष्ट केली. या राजकीय घडामोडीमुळे पंढरपूरमधील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.