अश्लील टिपण्यांना प्रोत्साहन दिल्याचे प्रकरण

मुंबई – विनोदवीर आणि अश्लील टिपण्यांना त्याच्या कार्यक्रमात प्रोत्साहन देणारा प्रणित मोरे याने क्षमायाचना केली आहे. त्याच्यावर प्रचंड प्रमाणात टीका झाल्यानंतर त्याने त्याचे ‘इन्स्टाग्राम’ खाते बंद केले होते. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर आता मोरे याने ‘मी भावनेच्या भरात वाहून गेलो. मी त्या वेळी थांबवू शकलो असतो; पण त्यावेळी मी ते करू शकलो नाही. जे कुणी दुखावले असतील, मी त्यांची क्षमा मागतो. मी चांगला माणूस बनून दाखवेन’, असे त्याच्या खात्यावर म्हटले आहे. मोरे याची संपत्ती ४ ते ८ कोटीपर्यंत असण्याची शक्यता आहे, अशी वृत्ते माध्यमांनी दिली आहेत.
ज्या हिमांशू जांगडा याच्या ‘मैत्रिणीकडून बिर्याणीचे पैसे वसूल करण्या’च्या द्विअर्थी अश्लील टिपणीला मोरे याने त्याच्या कार्यक्रमात प्रतिसाद दिला होता, त्याची नोकरी गेली आहे. हिमांशू, तसेच ‘देहदान करणार्या पुरुषांच्या अवयवांवर महाविद्यालयात असतांना अश्लील टिपणी करायचो’, असे सांगणार्या डॉ. सेजल पवार हिच्यावरही महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही या संपूर्ण घटनेची नोंद घेतली आहे.
डॉ. सेजल पवार हिने लेखी क्षमा मागितली आहे. के.ई.एम्. रुग्णालयाने तिला १५ दिवसांसाठी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. या प्रकरणी रुग्णालयाने ५ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. यामध्ये तिला तिची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. समाज माध्यमांवरील प्रसिद्धी, विद्यार्थिनीचे वर्तन, संस्थेची प्रतिमा आणि संबंधित तक्रारी या सर्व गोष्टींचा यात समावेश असेल.
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !
२२ ते २४ जून या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीच्या मूर्तीचे संवर्धन होणार !