
मुंबई – महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा, तंबाखू आणि पानमसाला यांची तस्करी करणार्या संघटित टोळ्यांवर थेट ‘मकोका’ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हे आदेश दिले आहेत.
आतापर्यंत केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई होत असल्याने मुख्य सूत्रधार मोकाट रहात होते; मात्र आता गुटखा उत्पादक, पुरवठादार, गुंतवणूकदार आणि गोदाम मालक अशा संपूर्ण साखळीचा छडा लावून हे नेटवर्क नष्ट केले जाईल. तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच अवघ्या १७ दिवसांत ३ कोटी २७ लाख रुपयांचा अवैध माल जप्त केला असून ३५ जणांवर गुन्हे नोंद केले आहेत. ‘प्रामाणिक व्यापार्यांना कोणताही त्रास होणार नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे, तसेच मुंढे यांनी दूध भेसळ करणार्या दुग्ध चालकांनाही सक्त ताकीद दिली असून ग्राहकांना दर्जेदार आणि सुरक्षित दूध मिळणे बंधनकारक केले आहे.
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !