वाडा, देवगड येथून १५ लाख रुपयांचा मुद्देमाल कह्यात

सिंधुदुर्ग – जिल्हा कृषी विभागाच्या भरारी पथकाने देवगड तालुक्यातील वाडा येथे कारवाई करून अवैधरित्या खतांची विक्री करणारी व्यक्ती आणि खत उत्पादन आस्थापन यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा नोंद केला आहे. या वेळी ५७ सहस्र ५०० रुपये किमतीचे एकूण ४ टन खत आणि १५ लाख रुपयांचा ट्रक, असा मुद्देमाल कह्यात घेण्यात आला.
वाडा येथे एका गोदामात एका ट्रकमधून सेंद्रिय खत उतरवले जात होते. याविषयी माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागाने या ठिकाणी अचानक धाड घातली असता, ‘मे. अष्टविनायक बायो फर्टिलायझर’ आस्थापनाचे ‘नवसंजीवनी सेंद्रिय खत’ सापडले. या प्रकरणी अधिक चौकशी केली असता, वाडा येथील सत्यवान परशुराम परब यांनी हे खत विक्रीसाठी आणले होते, तसेच संबंधित खत उत्पादक आस्थापनाकडे उत्पादन आणि विक्री यांचा कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.
जिल्ह्यात जर कुणीही अनधिकृतरित्या किंवा चढ्या दराने खते, बियाणे आणि कीटकनाशके यांची विक्री करत असेल, तर शेतकर्यांनी तातडीने कृषी विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच