जालना येथील घटना !

जालना – शहरातील एका नामांकित खासगी शाळेतील शिक्षकाने इयत्ता नववीत शिकणार्या एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी विकी शिंदे या नराधम शिक्षकाला अटक केली आहे. (शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणार्या अशा शिक्षकांना कठोर शिक्षा करणे आवश्यक ! – संपादक) आरोपी शिक्षक सामाजिक माध्यमातून पीडित मुलीच्या संपर्कात आला होता. त्याने तिच्यावर मानसिक दबाव टाकून तिची काही खासगी छायाचित्रे मिळवली. ही छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत त्याने विद्यार्थिनीला ब्लॅकमेल केले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीने हा सर्व प्रकार स्वत:च्या कुटुंबियांना सांगितला.
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Sonam Wangchuk : आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना देहली पोलिसांनी रुग्णालयात केले भरती !
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार