
फोंडा, १३ जून (वार्ता.) – मेटावाडा, कुळे येथील दूधसागर नदीत १३ जून या दिवशी सकाळी १० च्या सुमारास वास्को येथील ३ भावांसह एका युवकाचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रामण्णा परशु मदार (वय १९ वर्षे), लक्ष्मण परशु मदार (वय १९ वर्षे), हिराण्णा परशु मदार (वय २१ वर्षे) आणि विजय साजिली (वय२० वर्षे) अशी या ४ मृत युवकांची नावे असून हे सर्वजण वास्को येथील रहिवासी आहेत.
कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वास्को येथून ५ मित्र सकाळी रेल्वेने कुळे येथे आले. त्यानंतर ते सर्वजण मेटावाडा येथील दूधसागर नदीवर गेले. त्यांपैकी वरील ४ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, तर राहुल महादेव हरिजन (वय २० वर्षे) हा किनार्यावर थांबला. ज्या ठिकाणी हे युवक पाण्यात उतरले, त्या ठिकाणी खोल डोह होता. या युवकांना पोहता येत नव्हते. ते पाण्यात शिरल्यावर पाण्याची खोली आणि प्रवाह यांचा अंदाज न आल्याने हे चौघेही आतपर्यंत गेले आणि काही क्षणांतच बुडू लागले. किनार्यावर असलेल्या राहुल हरिजन याच्या हे लक्षात येताच त्याने साहाय्यासाठी आरडाओरड चालू केली; मात्र त्या ठिकाणी आसपास कुणीही नसल्याने साहाय्य मिळू शकले नाही आणि चौघेही पाण्यात बुडाले. राहुल हरिजन याने तात्काळ कुळे पोलीस ठाण्यात धाव घेऊन याविषयी माहिती दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक रोहन नाईक, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गावस, सुधाकर गावकर, हवालदार विराज देसाई आणि अन्य कर्मचारी घटनास्थळी धावले. त्यानंतर स्थानिक जीवरक्षकांच्या साहाय्याने काही वेळातच त्या चौघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. हे मृतदेह उत्तरीय पडताळणीसाठी मडगाव येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार करणार्या शिक्षकाला अटक !
२० संशयितांच्या शोधासाठी ५ पथके तैनात
गुटखा तस्करांवर थेट ‘मकोका’: मुख्य सूत्रधारांचे नेटवर्क उद्ध्वस्त करणार !
मांगेली परिसरात पहिल्याच पावसात उच्च दाबाच्या वीजवाहिनीचे खांब वाकले
अवैधरित्या खतांची निर्मिती आणि विक्री करणारे यांच्यावर गुन्हा नोंद
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला