
दोडामार्ग – तालुक्यातील खोकरल धार, मांगेली कुसगेवाडी ते देऊळवाडीपर्यंत उभारण्यात आलेल्या ११ के.व्ही. उच्च दाबाच्या वीजवाहिनीचे अनेक लोखंडी खांब नुकत्याच पडलेल्या पावसात वाकले. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तसेच कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या खांबांच्या कामांविषयी गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ही वीजवाहिनी रस्त्याच्या बाजूपट्टीला (साईडपट्टीला) टेकून उभारण्यात आली आहे. खांब उभारण्यासाठी आवश्यक त्या निकषांनुसार खोदकाम आणि बळकटीकरण करण्यात आले नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. परिणामी पावसाच्या प्रारंभीच अनेक ठिकाणी खांब झुकलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. या मार्गावरून प्रतिदिन वाहनांची आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. पावसाळ्यात वादळी वारे आणि मुसळधार पाऊस यांमुळे हे खांब रस्त्यावर किंवा वाहनांवर पडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार करणार्या शिक्षकाला अटक !
२० संशयितांच्या शोधासाठी ५ पथके तैनात
गुटखा तस्करांवर थेट ‘मकोका’: मुख्य सूत्रधारांचे नेटवर्क उद्ध्वस्त करणार !
मेटावाडा, कुळे येथे दूधसागर नदीत बुडून ४ जणांचा मृत्यू
अवैधरित्या खतांची निर्मिती आणि विक्री करणारे यांच्यावर गुन्हा नोंद
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला